शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

CoronaVirus: विषाणू मुद्दाम तयार केलेला नाही!; ‘डब्ल्यूएचओ’चे ठाम मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 07:07 IST

उगम प्राण्यांमधूनच झाल्याचे स्पष्टीकरण

जीनिव्हा : सध्या संपूर्ण जगात थैमान घालणारी ‘कोविड-१९’च्या साथीला काणणीभूत असलेल्या कोरोना विषाणूचा उगम चीनमध्ये प्राण्यांमधूनच झाला व हा विषाणू जनुकीय गुणसूत्रांत मुद्दाम फेरबदल करून प्रयोगशाळेत तयार केलेला नाही, असे ठाम प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केले आहे.माध्यमांसाठी घेतलेल्या व्हिडीओ ब्रीफिंगमध्ये संघटनेच्या प्रवक्त्या फादेला चैब म्हणाल्या, की सर्व उपलब्ध पुराव्यांवरून असे दिसते, की हा विषाणू प्राण्यांमधून आला आहे व तो प्रयोगशाळेत अथवा अन्यत्र मुद्दाम तयार केलेला नाही. हा विषणू प्राणिजन्य असल्याची शक्यता अधिक प्रबळ आहे.चैब पुढे म्हणाल्या, की प्राण्यांच्या सजीव साखळीतील मधले टप्पे गाळून हा विषाणू माणसापर्यंत कसा आला, हे मात्र स्पष्ट नाही. पण, त्याच्या उगमस्थानापासून माणसापर्यंतच्या प्रवासात कोणा तरी अन्य प्राण्याच्या माध्यमातून तो आला, हे मात्र नक्की. अशा प्रकारेच विषाणू वटवाघळांमध्ये असतात, हे माहीत आहे. पण, वटवाघळांपासून निघून आणि स्वरूपात बदल होऊन हा विषाणू माणसापर्यंत कसा पोहोचला, हे ठरविण्यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे. (वृत्तसंस्था)शंका, आरोप आणि खंडनया साथीची सुरुवात गेल्या डिसेंबरमध्ये चीनच्या ज्या वुहान प्रांतात झाली, तेथीलच वुहान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये चीनच्या लष्कराने जैविक अस्त्रांसाठीच्या प्रयोगांचा एक भाग म्हणून जैविक गुणसूत्रीय फेरबदल करून हा नवा विषाणू तयार केला व तेथून तो निष्काळजीपणाने बाहेर पडला, असे आरोप केले जात आहेत. चीन सरकारने व वुहान इस्टिट्यूटनेही याचा ठामपणे इन्कार केला आहे. तरीही, खासकरून अमेरिकेन ही शंका घेणे सोडलेले नाही. ट्रम्प प्रशासनाने याबद्दल चीन सरकारला औपचारिकपणे जाब विचारला नसला, तरी अमेरिकेतील मिसुरी राज्याने याच मुद्द्यावर तेथील संघीय न्यायालयात चीनविरुद्ध भरपाईचा दावा दाखल केला आहे. चीन सरकारच्या प्रवक्त्याने या दाव्याला कोणताही वस्तुनिष्ठ किंवा कायदेशीर आधार नाही व तो मूर्खपणाशिवाय दुसरे काही नाही, असे म्हणून त्याची खिल्ली उडविली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना