शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : पाकिस्तानमध्ये संक्रमितांची संख्या 33 हजारांच्या पार; 'स्मार्ट लॉकडाऊन' राबवण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 08:57 IST

पाकिस्ताननं कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. 'स्मार्ट लॉकडाऊन' राबविण्याच्या योजनेवर पाकिस्तान काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. 

ठळक मुद्देपाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूची बाधा झालेले 2870 नवीन रुग्ण समोर आल्यानंतर रविवारी संक्रमित लोकांची संख्या 33,330वर गेली आहे. आधीच आर्थिक आघाडीवर झगडत असलेल्या पाकिस्ताननं कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. 'स्मार्ट लॉकडाऊन' राबविण्याच्या योजनेवर पाकिस्तान काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. 

इस्लामाबादः पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूची बाधा झालेले 2870 नवीन रुग्ण समोर आल्यानंतर रविवारी संक्रमित लोकांची संख्या 33,330वर गेली आहे. आधीच आर्थिक आघाडीवर झगडत असलेल्या पाकिस्ताननं कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. 'स्मार्ट लॉकडाऊन' राबविण्याच्या योजनेवर पाकिस्तान काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. पाकिस्तानमधील नियोजन मंत्री असद उमर यांनी रविवारी माध्यमांना सांगितले की, ते 'स्मार्ट लॉकडाऊन' राबविण्याच्या योजनेवर काम करत आहेत. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून कोरोना व्हायरस हॉटस्पॉट्स शोधणे शक्य होणार आहे. लॉकडाऊनमध्ये सवलत देण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे निम्न उत्पन्न गटातील लोकांवर फार वाईट परिणाम होत आहेत. परंतु सावधगिरी बाळगली म्हणजे सर्व खबरदारीच्या उपाययोजना मागे घेण्यात आल्या आहेत, असं होतं नाही.कोरोनाचे हॉटस्पॉट्स ओळखण्यासाठी आणि 'स्मार्ट लॉकडाऊन' लागू करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. ओमर म्हणाले की, डेटा संकलित केला जात आहे आणि कोरोना विषाणूशी संबंधित माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, यासाठी देशभरातील सर्व रुग्णालयांना वेब पोर्टल तयार करण्यासाठी डेटा प्रदान करण्यास सांगितले जाईल. पंजाब सरकारने एक अ‍ॅप तयार केले आहे, जेणेकरून किती रिक्त बेड आहेत आणि किती व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत, अशी माहिती मिळणार आहे. या माहितीचा कोरोनाग्रस्तांना उपयोग होणार आहे.  त्यांनी सर्व खबरदारी घेण्याचे आवाहन केले आणि असे सांगितले की, व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी घेणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.शनिवारपासून टाळेबंदीतून काहीसा दिलासापाकिस्तानमध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण सापडत असूनही लॉकडाऊनमधून सूट देण्याच्या पहिल्या टप्प्याचा शनिवारी प्रारंभ झाला. पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने सकाळपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बरेच व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. पण डॉक्टरांनी या सवलतीविरोधात इशारा दिला आहे. सरकारने जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांचे पालन केले पाहिजे आणि बंदची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी पाकिस्तान मेडिकल असोसिएशनच्या प्रतिनिधींनी केली आहे.अन्य महत्त्वाच्या बातम्या

पाक दहशतवादी आज काश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याची शक्यता; ११ मे हाच दिवस का निवडला?

गिलगिट-बाल्टिस्‍तानवर भारताच्या 'मास्‍टरस्‍ट्रोक'ला सिक्कीममधील संघर्षातून चिनी उत्तर, तज्ज्ञांचा दावा

ड्रॅगन संपूर्ण एव्हरेस्ट गिळंकृत करायच्या मार्गावर; नेपाळनं उठवला आवाज

Coronavirus: येत्या ३० दिवसांत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या साडेपाच लाखांपर्यंत पोहचू शकते – रिपोर्ट

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान