नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे भारतात मृतांचा आकडा एक हजारांच्या पुढे गेला आहे. मात्र, भारताशेजारचे तीन देश असे आहेत जिथे कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. भारताचे तीन शेजारी देश नेपाळ, भूतान आणि मालदीव हे जगातील अशा काही देशांमध्ये आहेत, जिथे कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार, पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मालदीवमध्ये कोरोनाची २५० प्रकरणे समोर आली आहेत. परंतु एकाचा ही येथे मृत्यू झालेला नाही. नेपाळमध्येही कोरोनाचे ५४ रुग्ण आढळले आहेत. परंतु अद्याप येथे कोणाच्या ही मृत्यूची माहिती समोर आलेली नाही. भूतानमध्ये कोरोनाचे ७ रुग्ण आढळले आहेत. बांगलादेशात कोरोनाचे ७१०३ रुग्ण आढळले आहेत, ज्यात १६३ जण मरण पावले आहेत.
CoronaVirus News: 'या' तीन देशांत नाही एकही मृत्यू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 06:47 IST