शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

CoronaVirus News: कोरोना लस पुरवठ्याबद्दल कोणीही भारताला लेक्चर देऊ नये; फ्रान्सचे पंतप्रधान कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 15:40 IST

CoronaVirus News: भारतानं जगाला लसींच्या माध्यमातून मानवता निर्यात केली, आम्ही ठामपणे त्यांच्या पाठिशी; फ्रान्सचे पंतप्रधान मॅक्रन यांच्याकडून कौतुक

नवी दिल्ली: देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. महत्त्वाच्या राज्यांमध्ये कठोर निर्बंध लागू असतानाही देशात दररोज कोरोनाचे ४ लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र भारत बायोटेक आणि सीरमनं आंतरराष्ट्रीय करार केल्यानं त्यावरही मर्यादा येत आहेत. लसींच्या पुरवठ्यावरून फ्रान्सचे पंतप्रधान इम्यॅनुएल मॅक्रन ठामपणे भारताच्या पाठिशी उभे राहिले आहेत. “राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्राला जरुर लिहावं”कोरोना लसींच्या पुरवठ्यावरून भारताला कोणाचंही लेक्चर ऐकण्याची गरज नाही, असं इम्यॅनुएल मॅक्रन म्हणाले. ते युरोपियन युनियनच्या व्हर्च्यअल परिषदेत बोलत होते. भारतानं जगातल्या अनेक देशांना लसी पुरवल्या असून या माध्यमातून त्यांनी मानवतेची निर्यात केली आहे, अशा शब्दांत मॅक्रन यांनी भारताचं कौतुक केलं. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित होते. युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या सर्व २७ देशांनी जागतिक व्यापार संघटनेच्या बैठकीत प्रवासावर सवलत देण्याची भूमिका घ्यावी. यामुळे प्रत्येकाला कोरोनाची लस कमी किमतीत उपलब्ध होतील. कोरोनावरील उपचार कमी दरांत मिळतील, असं आवाहन मोदींनी केलं.“आता लसीकरणावरही राजकारण करणार आहात का?”; काँग्रेस आमदार शिवसेनेवर संतापलेपंतप्रधान मोदींनी युरोपियन युनियनमधील सर्व २७ देशांच्या प्रमुखांनी व्हर्च्युअल बैठकीत सहभाग घेतल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली. या बैठकीत भारत आणि युरोपियन युनियनमध्ये व्यापार, गुंतवणूक आणि दळणवळण क्षेत्रातील सहकार्य आणखी वाढवण्याविषयी चर्चा झाली. या बैठकीनंतर दोन्ही पक्षांमधील सहकार्य आणि संबंध नव्या उंचीवर जातील, अशी आशा परराष्ट्र मंत्रालयानं व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून युरोपियन युनियनमधील अनेक देश कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारतात मोलाचं सहकार्य करत आहे. कोरोना लसींचा साठा, वैद्यकीय मदत, ऑक्सिजन पुरवठा अशी सामग्री युरोपातील देशांकडून भारताला पुरवली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीFranceफ्रान्स