CoronaVirus News: कोरोनाचे मृत्यू अधिकृत आकडेवारीपेक्षा जास्त; नेचर नियतकालिकात संशोधकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 06:08 AM2022-01-21T06:08:45+5:302022-01-21T06:09:03+5:30

कोरोनामुळे जगात आजवर ५५ लाख ८४ हजार जण मरण पावल्याची अधिकृत आकडेवारी आहे.

CoronaVirus News Covid 19 deaths much higher than official figures claims report | CoronaVirus News: कोरोनाचे मृत्यू अधिकृत आकडेवारीपेक्षा जास्त; नेचर नियतकालिकात संशोधकांचा दावा

CoronaVirus News: कोरोनाचे मृत्यू अधिकृत आकडेवारीपेक्षा जास्त; नेचर नियतकालिकात संशोधकांचा दावा

Next

नवी दिल्ली : जगभरात कोरोनामुळे झालेले मृत्यू हे अधिकृत आकडेवारीपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहेत, असा दावा नेचर या नियकालिकातील एका लेखात करण्यात आला आहे. कोरोनामुळे जगात आजवर ५५ लाख ८४ हजार जण मरण पावल्याची अधिकृत आकडेवारी आहे.

काही देशांतील कोरोना रुग्णांसंदर्भातील व त्यांच्या मृत्यूची आकडेवारी सदोष आहे. सुमारे १०० देशांमध्ये कोरोना रुग्णांची माहिती योग्य पद्धतीने गोळा केली जात नाही. नेदरलँँड या देशात कोरोना चाचणी झालेले व त्यानंतर रुग्णालयात मरण पावलेल्या लोकांचीच मृत्यूविषयक यादीत नोंद केली जाते. बेल्जियममध्ये कोरोनासदृश लक्षणे असलेल्या, पण चाचणी न झालेल्यांपैकी जे मरण पावले त्यांचाही मृतांच्या आकडेवारीत समावेश करण्यात आला आहे.
नेचरमधील लेखात म्हटले आहे की, कोरोनाची साथ २०१९ मध्ये सुरू झाली. त्यानंतर आजपर्यंत कोरोनामुळे मरण पावलेल्यांचे प्रमाण अधिकृत आकडेवारीपेक्षा कदाचित दोन ते चार पट अधिक असावे. 

कोरोना विषाणूसोबत जगायला शिका : ब्रिटनचे आरोग्यमंत्री
कोरोनाच्या विषाणूसोबत आता जगायला शिकले पाहिजे, असे ब्रिटनचे आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, कोरोनाचा विषाणू यापुढे कायम आपल्यासोबत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरवर्षी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याची गरज भासू शकते. ब्रिटनमधील शाळा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, दुकानांमध्ये मास्क घालण्याचा असलेला नियम पुढील आठवड्यापासून रद्द करण्याची घोषणा साजिद जाविद यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले. 

Web Title: CoronaVirus News Covid 19 deaths much higher than official figures claims report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.