शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: चीन आगामी दिवसांत कोरोनाच्या लसीबाबत करणार मोठी घोषणा; शास्त्रज्ञांनी केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 11:22 IST

कोरोनावर मात करण्यासाठी अनेक ठिकाणी लसीच्या प्रयोगाचा पहिला, दुसरा टप्पा सुरू आहे.

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेलं आहे. जगभरात आतापर्यंत ७१ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४ लाख ८ हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी सर्व देशातील सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. तसेच कोरोनाच्या उपचारासाठी लसीची चाचणी देखील अनेक देशात करण्यात येत आहे. त्यातच आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

चीनमधील डेली मेलच्या वृत्तानूसार, चीनमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीची अंतिम टप्प्यातील चाचणी सुरु आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच चीन कोरोनाच्या लसीबाबत मोठी घोषणा करणार असल्याचा दावा चीनच्या कोरोनाविरोधी उपाययोजनांचे प्रमुख असणारे डॉ. झोंग नानशान यांनी केला आहे. तसेच घोषणा केल्यानंतर कोरोनावरील लसी सप्टेंबरपर्यंत रुग्णालयात उपचारासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती झोंग नानशान यांनी दिली आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी अनेक ठिकाणी लसीच्या प्रयोगाचा पहिला, दुसरा टप्पा सुरू आहे. ही कौतुकाची बाब असली तरी यापुढे वाटचाल करताना औषधनिर्माण उद्योग, अभ्यासक, संशोधन केंद्रे तसेच जैवतंत्रज्ञान क्षेत्र या सर्वांचा आपसांत समन्वय असणे आवश्यक आहे. अनेक प्रकारची आकडेवारी सांगून या साथीबाबत दिलासा देणे विविध पातळींवरून सुरू आहे. मात्र, लशीचा शोध लागेल तो दिवस खऱ्या अर्थाने दिलासा देणारा असेल, असे मत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या अ‍ॅलर्जी आणि संसर्गजन्य रोग विभागातील लस संशोधन केंद्राचे संचालक डॉ. जॉन मस्कोला यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, जगातील रुग्णसंख्या 71 लाखांवर गेली, तर मृत्यूच्या संख्येने 4 लाखांचा टप्पा ओलांडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. भारतातही  लॉकडाऊन उठण्यास सुरुवात झालेली असतानाच कोरोनाचे हजारांवर 9 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या 2 लाख 56 हजारांवर पोहचली आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus News: दिलासादायक! राज्यात ४० हजारांहून अधिक रुग्णांनी केली कोरोनावर मात

'मला काहीही फरक पडत नाही पण...'; वांद्रे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यास रोखल्यानंतर सोनू सूदची प्रतिक्रिया

10 जूनपासून नवा नियम लागू; 'या' बँकेतील ग्राहकांना होणार फायदा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनIndiaभारतdocterडॉक्टरCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या