शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाचा कहर सुरू असताना चीननं मोठा निर्णय घेतला; संपूर्ण जगालाच बसणार फटका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 12:07 IST

CoronaVirus News: संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत असताना चीन सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे सगळ्यांच्या अडचणींत वाढ

नवी दिल्ली: भारतात कोरोनाचं थैमान सुरू आहे. मे महिन्यात तीन दिवस देशात ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे परदेशांमधून भारताला मदत मिळत आहे. तर भारतातून मोठ्या प्रमाणात औषधांची निर्यात सुरू आहे. मात्र चीननं घेतलेल्या एका निर्णयाचा फटका संपूर्ण जगाला बसण्याची शक्यता आहे. भारतात मोठ्या प्रमाणात औषधांचं उत्पादन होतं. देशातून जगभरात औषधं पुरवली जातात. मात्र चीनच्या एका निर्णयामुळे जगभरात औषधांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! गेल्या 24 तासांत 4,14,188 नवे रुग्ण, 2 कोटींचा टप्पा केला पारचीननं मालवाहू विमानांच्या उड्डाणांवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. यासोबतच भारताकडून औषधांची आयात करणाऱ्या देशांसमोरही समस्या निर्माण झाली आहे. अमेरिका औषधांसाठी मोठ्या प्रमाणात भारतावर अवलंबून आहे. भारताकडून औषधं आयात करणाऱ्या देशांची संख्या खूप मोठी आहे. मात्र चीननं कच्च्या मालाचा पुरवठा थांबवल्यानं भारतातील औषध निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगभरात औषधांची टंचाई निर्माण होऊ शकते.महाराष्ट्रातील कोरोनाचा कहर केव्हा थांबणार?; दिलासादायक माहिती समोरभारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर चीननं सरकारी विमान कंपनी सिचुआन एअरलाईन्सच्या मालवाहू विमानांची उड्डाणं रोखली. याबद्दल भारतीय औषधं निर्मिती संघाचे अध्यक्ष महेश दोषी यांनी चिंता व्यक्त केली. भारतात तयार होणाऱ्या औषधांसाठीचा ६० ते ७० टक्के कच्चा माल चीनहून येतो. त्यामुळे चीननं घेतलेल्या निर्णयाचा परिणाम औषध उत्पादनांवर होऊ शकतो अशी भीती दोषी यांनी व्यक्त केली. यासंदर्भात दोषी यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी २९ एप्रिलला पत्र लिहिलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन