Corona Vaccine: कोरोना लस देताच महिलेला आला हार्ट अटॅक; न्यूझीलंडमध्ये लसीकरणानंतर पहिलाच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 04:59 PM2021-08-30T16:59:31+5:302021-08-30T17:01:30+5:30

न्यूझीलंडच्या ऑकलँडमध्ये कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे कहर माजला आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता याठिकाणी दोन आठवड्याचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

Coronavirus: New Zealand reports first death linked to Pfizer COVID-19 vaccine due to myocarditis | Corona Vaccine: कोरोना लस देताच महिलेला आला हार्ट अटॅक; न्यूझीलंडमध्ये लसीकरणानंतर पहिलाच मृत्यू

Corona Vaccine: कोरोना लस देताच महिलेला आला हार्ट अटॅक; न्यूझीलंडमध्ये लसीकरणानंतर पहिलाच मृत्यू

Next
ठळक मुद्देन्यूझीलंडमध्ये कोविड १९ चे ३ हजार ५१९ लोकं संक्रमित झाले असून त्यातील २६ लोकांचा मृत्यू झाला आहे.ज्याला कोविड १९ लस फायजरच्या अतिशय दुर्लभ दुष्परिणाम(Rare Side Effect) म्हणून ओळखलं जातं. स्वतंत्र कोविड १९ लस सुरक्षा देखरेख बोर्डाच्या रिपोर्टनंतर आरोग्य विभागाने याची माहिती दिली आहे.

वेलिंगटन – गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगात कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवला आहे. चीनच्या वुहान शहरात पसरलेला व्हायरस काही काळातच जगभरात पसरला. कोरोना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी सध्या अनेक देश लसीकरण मोहिमेवर भर देत आहेत. त्यातच न्यूझीलंड येथे कोरोना लस फायजर(Corona Vaccine Pfizer) मुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. स्वतंत्र कोविड १९ लस सुरक्षा देखरेख बोर्डाच्या रिपोर्टनंतर आरोग्य विभागाने याची माहिती दिली आहे. परंतु या महिलेचे वय सांगण्यात आले नाही.

लस घेतल्यानंतर मायोकार्डिटिसमुळे मृत्यू

न्यूझीलंडच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, या महिलेचा मृत्यू मायोकार्डिटिसमुळे झाला आहे. ज्याला कोविड १९ लस फायजरच्या अतिशय दुर्लभ दुष्परिणाम(Rare Side Effect) म्हणून ओळखलं जातं. ही ह्दयासंबंधीचा आजार असल्याचं कोविड १९ लस देखरेख बोर्डानं मान्य केले आहे आहे.

मायोकार्डिटिस म्हणजे काय?

मायोकार्डिटिस(Myocarditis) आजारामुळे ह्दयाच्या मांसपेशीमध्ये सूज येण्याची समस्या होते. त्यामुळे ह्दयातील रक्तवाहिन्यावर त्याचा परिणाम होतो. सर्वसामान्य स्थितीत ह्दयातील रक्त पंपिंग करण्यास अडचण येते. ज्यामुळे ह्दयाचे ठोके अनियमित होतात. हार्टच्या मांसपेशी ऑक्सिजनयुक्त रक्त पंप करण्यासाठी मेहनत घेत असतात. ज्यामुळे मांसपेशीमध्ये सूज आल्याची समस्या होते.

ऑकलँडमध्ये दोन आठवड्याचा लॉकडाऊन

न्यूझीलंडच्या ऑकलँडमध्ये कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे कहर माजला आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता याठिकाणी दोन आठवड्याचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, न्यूझीलंडमध्ये कोविड १९ चे ३ हजार ५१९ लोकं संक्रमित झाले असून त्यातील २६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २ हजार ८९० लोकांना कोरोना महामारीवर मात दिली आहे. न्यूझीलंडमध्ये कोरोना व्हायरसचे ६०३ सक्रीय रुग्ण आहेत. ज्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

कोरोनाचा विस्फोट! प्रगत अमेरिकाही हतबल

अमेरिकेत कोरोनाचं घातक रुप पाहायला मिळत आहे. अनेक राज्यातील रुग्णालयात बेड आणि स्टाफची कमतरता होती. मात्र आता ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा, साऊथ कॅरोलिना, टेक्सास आणि लुईसियानासारख्या राज्यातील रुग्णालयांना ऑक्सिजनच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. डोना क्रॉस यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण ऑक्सिजन टँक हे 90 टक्के भरले जातात. जेव्हा टँकमध्ये 40 ते 50 टक्के ऑक्सिजन शिल्लक असतो तेव्हा तो टँक पुन्हा भरला जातो. मात्र आता 10 ते 20 टक्के ऑक्सिजन शिल्लक राहिल्यावर तो भरण्यात येत आहे.

Read in English

Web Title: Coronavirus: New Zealand reports first death linked to Pfizer COVID-19 vaccine due to myocarditis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.