शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
5
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
6
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
7
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
8
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
9
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
10
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
11
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
12
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
13
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
14
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
15
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
16
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
17
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
18
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
19
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
20
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 20:47 IST

Coronavirus : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये कोरोनाचा हा व्हेरिएंट वेगाने पसरत आहे. पाकिस्तानमध्ये या संसर्गाची अनेक प्रकरणे नोंदवली आहेत.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा कहर (Coronavirus)  अजूनही जगभरात सुरू आहे. दीड वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही जग अद्याप कोरोनाच्या कचाट्यातून मुक्त झालेले नाही. यादरम्यान, भारतासह संपूर्ण जगाने कोरोनाचे (Corona in World)विविध व्हेरिएंट आणि त्याचे गंभीर परिणाम पाहिले आहेत. तरीही कोरोना व्हायरसचे नवीन व्हेरिएंट (Covid19 New Variant) वेगवेगळ्या देशांमधून समोर येत आहेत. (Coronavirus: new variant cases of epsilon variant increase in pakistan this virus is transmitted very fast)

2020 मध्ये कॅलिफोर्नियामध्ये आढळलेला कोरोनाचा एप्सिलॉन व्हेरिएंट (Epsilon variant) आता पुन्हा एकदा लोकांना संक्रमित करत आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये कोरोनाचा हा व्हेरिएंट वेगाने पसरत आहे. पाकिस्तानमध्ये या संसर्गाची अनेक प्रकरणे नोंदवली आहेत.

लाहोरमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटच्या पाच नवीन प्रकरणांमुळे सरकारची चिंता वाढली आहे. एप्सिलॉन व्हेरिएंट न्यूयॉर्कमधील दुसरा सर्वात घातक कोरोना व्हेरिएंट होता, जो लसीला प्रतिरोधक होता आणि तो डेल्टा व्हेरिएंटप्रमाणेच वेगाने वाढतो, असे म्हटले जात आहे.

दरम्यान, संपूर्ण जगाने एप्रिल आणि मे महिन्यात भारतात आलेल्या डेल्टा व्हेरिएंट विनाशकारी परिणाम पाहिले आहेत. डेल्टा व्हेरिएंट दुसऱ्या कोरोनाच्या लाटेत समोर आला. आता कोरोनाच्या एप्सिलॉन व्हेरिएंटमध्ये दक्षिण आशियात प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत, आता त्याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

सर्वात आधी कॅलिफोर्नियामध्ये आढळला होताएप्सिलॉन व्हेरिएंट - ज्याला CAL.20C असेही म्हणतात. पहिल्यांदा कॅलिफोर्नियामध्ये आढळला होता. युनायटेड स्टेट्स सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेंशन अँड कंट्रोलनेही (सीडीसी) याबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे. हा व्हायरस अमेरिकेसह एकूण 34 देशांमध्ये आढळला आहे. मात्र तो अजून फार मोठ्या प्रमाणावर नाही. फेब्रुवारी 2021 मध्ये अमेरिकेत व्हायरसच्या एकूण प्रकरणांच्या 15 टक्के रुग्णांमध्ये हा व्हेरिएंट आढळला होता.

लस प्रतिरोधक आहे एप्सिलॉन हा व्हेरिएंट अधिक प्राणघातक आहे, कारण हा लस प्रतिरोधक आहे. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधकांच्या नेतृत्वाखालील अभ्यासात असे दिसून आले आहे की, व्हेरिएंट लसींसाठी अधिक प्रतिरोधक आहे. 1 जुलै रोजी पीअर-रिव्ह्यू जर्नल सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात म्हटले आहे की, एप्सिलॉन स्ट्रेन "लॅब-जनरेटेड अँटीबॉडीज पूर्णपणे टाळू शकतो आणि लसीकरण केलेल्या लोकांच्या प्लाझ्मामध्ये निर्माण झालेल्या अँटीबॉडीजची प्रभावशीलता कमी करू शकतो."

हा व्हेरिएंट वेगाने पसरतोआतापर्यंत समोर आलेल्या कोरोना व्हायरसच्या सर्व व्हेरिएंटपैकी हा व्हेरिएंट लोकांमध्ये अधिक वेगाने पसरतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोक खूप कमी वेळात याला बळी पडू शकतात. एका अहवालानुसार, हा व्हेरिएंट इतर व्हेरिएंटपेक्षा 20 टक्के वेगाने पसरते.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याPakistanपाकिस्तान