शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: नेदरलँडमध्ये आढळला कोरोनाचा नवीन 'सेंटॉरस' व्हेरिएंट; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 16:36 IST

Coronavirus: नेदरलँडमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा एक नवीन सब प्रकार आढळला आहे.

नेदरलँड: कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा आणखी एक अत्यंत संसर्गजन्य प्रकार समोर आला आहे. BA.2.75 सब व्हेरिएंट, ज्याला सेंटॉरस असे नाव देण्यात आले आहे. नेदरलँडमध्ये हा नवीन व्हेरिएंट सापडला आहे. या प्रकाराचा झपाट्याने प्रसार होत असल्याने आरोग्य तज्ज्ञ चिंतेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा प्रकार नॉर्थईस्ट गेल्डरलँड प्रांतात घेतलेल्या नमुन्यात आढळला आहे.

फ्रान्स प्रेसच्या एजन्सीनुसार, डच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थने बुधवारी ही माहिती दिली. या प्रकाराविषयी फारशी माहिती उपलब्ध नसली तरी, हे अत्यंत संसर्गजन्य असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या आठवड्यात, जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी ट्विट केले होते की, त्या या प्रकारावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या प्रकाराच्या स्पाइक प्रोटीनमध्ये म्यूटेशन झाल्याचे दिसून आले आहे.

अमेरिकेत BA.5 व्हेरिएंटची प्रकरणे वाढली दरम्यान, कोरोना विषाणूच्या अत्यंत संसर्गजन्य BA.5 व्हेरिएंटमुळे अमेरिकेत संसर्गाची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. या व्हेरिएंटमुळे संसर्ग होण्याचे प्रमाण 65 टक्के आहे, तर 16 टक्के लोकांना BA.4 ची लागण झाली आहे. काही आठवड्यांत, नवीन ओमायक्रॉन सब-व्हेरियंटसह रुग्णालयात दाखल होणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. राज्य आणि शहर प्रशासनासोबतच व्हाईट हाऊसही याला सामोरे जाण्यासाठी नवीन पावले उचलत आहे.

भारतात सर्वात आधी आढळलाजागतिक आरोग्य संघटनेतील कोव्हिड-19 तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन केरखोव्ह यांच्या मते, सेंटॉरसचा सब व्हेरिएंट मे महिन्यात पहिल्यांदा भारतात आढळले होते. त्यानंतर हा ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, युनायटेड किंगडम, यू.एस. आणि जपानसह इतर 14 देशांमध्ये आढळला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCorona vaccineकोरोनाची लस