शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : 100 गाड्यांचा ताफा अन् बरंच काही... अमेरिकेत भारतीय डॉक्टरचा अनोखा सन्मान, Video पाहून वाटेल अभिमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 10:27 IST

Coronavirus : कोरोनाग्रस्तांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे.

वॉशिंग्टन - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 1,80,000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कोरोनाग्रस्तांची संख्या 26 लाखांवर पोहोचली आहे. कोरोनाग्रस्तांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. अमेरिकेत कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या भारतीयडॉक्टरचा अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला आहे.

उमा मधूसूदन असं या भारतीय वंशाच्या डॉक्टरचं नाव असून त्या सध्या साऊथ विंडसरमध्ये राहतात. उमा मधूसूदन यांनी अमेरिकेत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार केले असून त्यातील अनेक जण बरे झाले आहेत. उमा यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचा अमेरिकेतील लोकांनी अनोख्यारितीने सन्मान केला आहे. तब्बल 100 गाड्यांच्या ताफ्यासह त्यांचे आभार मानले आहेत. अमेरिकेतील लोकांनी गाड्यांचे हॉर्न वाजवत त्यांचा सन्मान केला. या कौतुकास्पद घटनेचा एक व्हिडिओ अनेकांनी शेअर केला असून सोशल मीडियावरही जोरदार  व्हायरल झाला आहे. 

पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकेच्या गाड्यांनीही सायरन वाजवून त्यांचा सन्मान केला. तसेच उमा यांनी उपचार केलेल्या लोकांनी हातात पोस्टर्स धरले आहेत ज्यामध्ये त्यांनी डॉक्टरचे आभार मानले आहेत. व्हिडिओमध्ये उमा यांच्या घरासमोरून जाताना प्रत्येक गाडी हॉर्न वाजवून उमा यांचा सन्मान करत असल्याचं पाहायला मिळत आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची आणि मृतांची संख्या ही सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा आठ लाखांहून अधिक झाला आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या 849,092 झाली असून आतापर्यंत 47,681 जणांचा मृत्यू झाला आहे.

जगात कोरोनाच्या आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या 26 लाख 37 हजारांवर गेली असून, मृतांचा एकूण आकडा 1 लाख 84 हजारांच्या घरात पोहोचला आहे. तर आतापर्यंत जगभरात 7 लाख 17 हजार 635 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेनंतर इटलीत सर्वाधिक मृत्यू झाले असून कोरोनाग्रस्तांची संख्या 187,327 वर गेली आहे. तर तब्बल 25,085 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : बापरे! 2 महिन्यांनंतरही शरीरात जिवंत आहे व्हायरस, ठीक झालेल्या रुग्णांना कोरोनाची लागण

Coronavirus : कोरोनाचा विळखा! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 26 लाखांवर, 184,217 जणांचा मृत्यू

CoronaVirus: कोरोना प्रसाराचा वेग देशात दुप्पट नाही; आरोग्य मंत्रालयाचा दावा

CorornaVirus: देशात १४८६ जणांची भर; कोरोना रुग्णांची संख्या २१,३७० वर

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाdoctorडॉक्टरIndiaभारतDeathमृत्यू