शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

CoronaVirus News : पाकिस्तानमध्ये कोरोनाचे थैमान! 'या' 12 देशांतील प्रवाशांना प्रवेश बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 14:59 IST

Pakistan And Corona Virus : पाकिस्तानमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने 12 देशांमधील प्रवाशांना एक महिन्यांसाठी प्रवेश बंदी जाहीर केली आहे. 

इस्लामाबाद - संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 11 कोटींवर गेली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.  याच दरम्यान आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वीच चीनची कोरोनाची लस टोचून घेतली होती. त्यानंतरही आता त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने 12 देशांमधील प्रवाशांना एक महिन्यांसाठी प्रवेश बंदी जाहीर केली आहे. 

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पाकिस्तानने हा निर्णय घेण्यात आला आहे. या देशात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनाही हा आदेश लागू असणार आहे. प्रवेश बंदी केलेल्या देशांमध्ये दक्षिण आफ्रिका, रवांडा आणि टांझानियासह 12 देशांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमध्ये कोरोनाचा दक्षिण आफ्रिका स्ट्रेन आढळून आला होता. पाकिस्तानमध्ये कोरोनाचे दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलचे स्ट्रेन आढळल्यानंतर नागरी विमान प्राधिकरणाने देशांची सूची जारी केली असून ए, बी, सी अशी वर्गवारी केली आहे. सी गटातील 12 देशांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. या 12 देशांवर 23 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत प्रवास बंदी असणार आहे.

पाकिस्तानने बोत्सवाना, ब्राझील, कोलंबिया, कोमोरोस, घाना, केनिया, मोझाम्बिक, पेरू, रवांडा, दक्षिण आफ्रिका, टांझानिया आणि झांबिया आदी देशांना 'सी' गटात ठेवलं आहे. या देशांतील नागरिकांना पाकिस्तानमध्ये प्रवेश बंदी असणार आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं प्राधिकरणाने म्हटंलं. पाकिस्तानने दिलेल्या माहितीनुसार, ए गटातील देशांमधून आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांना पाकिस्तानमध्ये दाखल होण्याआधी कोरोना चाचणी करणे आवश्यक नाही. या 'ए' गटात ऑस्ट्रेलिया, भूतान, चीन, फिजी, जपान, कझाकिस्तान, लाओस, मंगोलिया, मॉरिटानिया, मोरक्को, नेपाळ, न्यूझीलंड, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया, श्रीलंका, ताझिकीस्तान, व्हिएतनाम, त्रिनिदाद आणि टोबॅको आदी देशांचा समावेश आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान कोरोना पॉझिटिव्ह; दोन दिवसांपूर्वी घेतली होती चीनची लस 

पाकिस्तानमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6.26 लाखांहून अधिक झाली आहे. तर 13,843 जणांचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचे स्पेशल असिस्टंट फैजल सुल्तान यांनी ट्विट करून खान यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर इम्रान खान यांनी स्वत:ला आयसोलेटेड करून घेतलं असून संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन देखील केलं आहे. पाकिस्तानमध्ये वेगाने कोरोनाचा प्रसार होत असतानाच इम्रान खान यांनी गुरुवारी चीनच्या कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर देखील ते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान