शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: चीनने केले कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सीनचे परीक्षण; दिसून आला आशादायक 'रिझल्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 00:39 IST

द लॅन्सेटने एका प्रेस स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे, 108 स्वस्थ तरुणांवर केलेल्या ओपन-लेबल ट्रायलचे 28 दिवसांनंतर आशादायक परिणाम दिसून येत आहेत.

ठळक मुद्देक्लिनिकल ट्रायलच्या पहिल्या टप्प्यावर पोहचणारी ही पहिलीच सुरक्षित व्हॅक्सीन असल्याचे आढळून आले आहे.मानवी शरीरात कोरनाविरोधात आवश्यक असणारी प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासही ही व्हॅक्सीन सक्षम असल्याचे एका जर्नलमध्ये म्हणण्यात आले आहे.बिजिंग इस्टिट्यूट ऑफ बायोटेक्नॉलॉजीचे प्रोफेरस वेई चेन हे, या अभ्यासाचे प्रमुख आहेत.

लंडन :चीनमध्ये कोरोना व्हायरसवरील एका व्हॅक्सीनचे ट्रायल करण्यात आले आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे, क्लिनिकल ट्रायलच्या पहिल्या टप्प्यावर पोहचणारी ही पहिलीच सुरक्षित व्हॅक्सीन असल्याचे आढळून आले आहे. तसेच, मानवी शरीरात कोरनाविरोधात आवश्यक असणारी प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासही ही व्हॅक्सीन सक्षम असल्याचे मेडिकल जर्नल 'द लॅन्सेट'मध्ये शुक्रवारी ऑनलाइन प्रसिद्ध झालेल्या एका अध्यनात म्हणण्यात आले आहे. 

द लॅन्सेटने एका प्रेस स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे, 108 स्वस्थ तरुणांवर केलेल्या ओपन-लेबल ट्रायलचे 28 दिवसांनंतर आशादायक परिणाम दिसून येत आहेत. मात्र, अंतिम रिझल्टचे मुल्यांकन सहा महिन्यानमध्ये केले जाईल. ही रोगप्रतिकार शक्ती कोरोनापासून बचाव करण्यास कितपत सक्षम आहे, हे सांगण्यासाठी पुढील ट्रायल आवश्यक आहे, असेही मेडिकल जर्नलमध्ये म्हणण्यात आले आहे. 

CoronaVirus News: कोरोनाचा 'भयानक' परिणाम! सुकून पार 'असा' झाला 'बॉडी बिल्डर', पहा - Photo

या व्हॅक्सीनचा आलेला रिझल्ट हा एक मैलाचा दगड आहे. नवीन अ‍ॅडेनोव्हायरस टाईप 5 व्हेक्टर्ड कोविड -19 (एडी5-एनसीओव्ही) व्हॅक्सीनचा एक डोस 24 तासांत व्हायरस-स्पेसिफिक अंटिबॉडीज आणि टी सेल्स तयार करतो, यामुळे पुढील तपासणीसाठी संभाव्य उमेदवार तयार होतात, असे या ट्रायलमध्ये दिसून आल्याचे बिजिंग इस्टिट्यूट ऑफ बायोटेक्नॉलॉजीचे प्रोफेरस वेई चेन यांनी म्हटले आहे. ते या अभ्यासाचे प्रमुख आहेत.

Pakistan Plane Crash: शेवटच्या काही सेकंदांत कॉकपिटमध्ये काय घडलं, 'हे' होते पायलटचे शेवटचे शब्द

"तथापी, या व्हॅक्सीन निर्मितीसाठी अनेक आव्हानं आहेत. रोगप्रतिकार शक्तीला चालना देण्याची क्षमता असलेली ही व्हॅक्सीन मानवाचे कोविड-१९ पासून संरक्षण करेलच असे दर्शवत नाही. हा रिझल्ट कोरोनावरील व्हॅक्सीन तयार करण्यासाठी आशादायक मार्ग दाखवतो. मात्र, अद्याप, ही व्हॅक्सीन सर्वांपर्यंत पोहोचण्यापासून आपण फार दूर आहोत, असे चीनने म्हटले आहे.

चीनची धमकी! आता अमेरिकेने परिणाम भोगायला तयार रहावे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनProfessorप्राध्यापकmedicinesऔषधंMedicalवैद्यकीयmedicineऔषधं