शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
5
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
6
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
7
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
8
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
9
बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे
10
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
11
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
12
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
13
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
14
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
16
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
17
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
18
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
19
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
20
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन

CoronaVirus Live Updates : हाहाकार! 'या' देशात कोरोनाची सातवी लाट; एका दिवसात सापडले तब्बल अडीच लाख नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 12:39 PM

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विस्फोट झाला आहे. देश कोरोनाच्या सातव्य़ा लाटेचा सामना करत आहे.

जगभरात कोरोनाचा हाहकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 60 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने काही ठिकाणी भीषण परिस्थिती आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगभरात कोरोनाने आतापर्यंत 64 लाख लोकांचा बळी गेला आहे. तर 60 कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून एकूण रुग्णांची संख्या 600,021,122 आहे. 

जपानमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. देश कोरोनाच्या सातव्य़ा लाटेचा सामना करत आहे. जपानमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून एका दिवसात तब्बल अडीच लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारी 2,61,029 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, सलग दुसऱ्या दिवशी हा विक्रमी उच्चांक गाठला आहे. यापूर्वी गुरुवारी 2,55,534 कोरोना प्रकरणे नोंदवली गेली होती. देशातील 47 पैकी 19 प्रांतांमध्ये दैनंदिन संसर्गामध्ये विक्रमी वाढ दिसून आली.

होक्काइडोमधील 8632, नागासाकीमध्ये 4611, मियागीमध्ये 4567, हिरोशिमामध्ये 8775 आणि फुकुओकामधील 15726 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.  गंभीर लक्षणांसह रुग्णालयात दाखल झालेल्या संक्रमित लोकांची संख्या गुरुवारपासून वाढली आहे, तर 294 जणांचा मृत्यू झाला आहे. टोकियो मेट्रोपॉलिटन सरकारने 27676 नवीन प्रकरणे नोंदवली. तर राजधानीत कोरोनामुळे  28 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

स्थानिक मीडिया क्योडो न्यूजने जागतिक आरोग्य संघटनेच्या कोरोना विषाणू संसर्गावरील साप्ताहिक अपडेटचा हवाला देऊन म्हटले आहे की जपानमध्ये 8 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या आठवड्यात 1395301 प्रकरणे नोंदवली गेली. त्यापाठोपाठ दक्षिण कोरिया आणि अमेरिकेचा क्रमांक लागतो. जगभरात कोरोनाने थैमान घातले असून अनेक प्रगत देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJapanजपान