शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! जगभरात गेल्या 24 तासांत तब्बल 12 लाख नवे रुग्ण; 4888 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 15:08 IST

CoronaVirus Live Updates : कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 44 कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही 448,199,677 वर पोहोचली आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक प्रगत देश कोरोना व्हायरसपुढे हतबल झाले आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 44 कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही 448,199,677 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 6,027,582 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत 382,376,008 जणांनी कोरोनाची लढाई जिंकली असून उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाचा वेग मंदावत असताना धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. 

जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 12 लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर चार हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.  Worldometers नुसार, 7 मार्च रोजी जगभरात 1215764 नवे रुग्ण सापडले. तर 4888 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, जर्मनी, रशिया, ब्रिटन आणि नेदरलँडमध्ये कोरोनाने थैमान घातलं आहे. दक्षिण कोरियामध्ये सर्वाधिक म्हणजे दोन लाखांहून जास्त रुग्ण आढळून आले आहेत. व्हिएतनाम 147,358, जर्मनी 122,895, रशिया 73,162, नेदरलँड 64,441, जापान 55 हजार, यूके 42,040 आणि अमेरिकेमध्ये 25,751 रुग्ण आढळून आले आहेत. रशियामध्ये 688 लोकांचा मृत्यू झाला असून हा आकडा सर्वाधिक आहे. यानंतर अमेरिकेत 508 जणांचा मृत्य़ू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

चीनने पुन्हा एकदा वाढवलं जगाचं टेन्शन; एका दिवसात आढळले सर्वाधिक रुग्ण

चीनच्या वुहानमधून कोरोनाचा वेगाने प्रसार झाल्याचं म्हटलं गेलं. त्यानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात चीनला बऱ्यापैकी यश आलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचं संकट आलं आहे. चीनने जगाचं टेन्शन वाढवलं असून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार होत असल्याची माहिती समोर आली आहे. चिनी मीडियानुसार, महामारीच्या सुरुवातीस वुहानमध्ये उद्रेक झाल्यानंतर आता देशात एकाच दिवसात सर्वाधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. चीनमध्ये कोरोनाचे 526 नवे रुग्ण आढळून आले आहे, जी गेल्या दोन वर्षांत एका दिवसात सर्वाधिक संसर्गाची संख्या आहे. त्यापैकी 214 रुग्णांमध्ये लक्षणं आहेत. तर 312 रुग्ण लक्षणे नसलेले होते. चीनने म्हटलं आहे की इतकी प्रकरणे म्हणजे कोविड शून्य धोरणाला मोठा धक्का आहे. त्याचबरोबर चीनमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर इतर देशही सतर्क झाले असून त्यांनी नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.

कोरोनाचा खतरनाक परिणाम; मेंदूत दिसताहेत भीतीदायक संकेत, रिसर्चमध्ये खुलासा

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या रिसर्चमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. रिसर्चनुसार, कोरोनाग्रस्त लोकांचा मेंदू आकुंचित म्हणजे छोटा होऊ लागला आहे. रिसर्चमधून धडकी भरवणारी माहिती मिळत आहे. शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, मेंदूचा पहिला एमआरआय आणि कोरोना झाल्यानंतरच्या एमआरआयमध्ये मोठा फरक आहे. ज्या लोकांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे होती, त्यांच्या मेंदूचा आकारही हळूहळू कमी होऊ लागला आहे. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे मेंदूचा आकार लहान होत असल्यामुळे मेंदूतील ग्रे मॅटर कमी होत आहे. ग्रे मॅटरमुळे माणसाची स्मरणशक्ती तयार होते. हे गंध ओळखण्याशी देखील थेट संबंधित आहे. कोरोनानंतर मेंदूमध्ये झालेला हा बदल कायमस्वरूपी आहे की नाही हे अद्याप संशोधकांना माहीत नसले तरी मेंदू स्वतःला बरा करण्यात पटाईत आहे यावर त्यांनी भर दिला. यावर दीर्घकाळ संशोधन झाल्यावरच याबाबत अधिक माहिती मिळू शकेल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस