शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : वुहानमधील निर्बंध उठविणार : चीन सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 12:13 IST

जग लॉक डाऊनच्या दिशेने...

ठळक मुद्देयुरोप, अमेरिकेसह अशिया खंडातील अनेक देश वेगाने लॉक डाऊनकडे चीनमधील कोरोनाची साथ आटोक्यातवुहानमधे कोरोनाची साथ पसरल्याचे लक्षात आल्यानंतर जानेवारी महिन्याच्या मध्यावर शहर बंद

पुणे : कोरोनामुळे जगभर संचारबंदीची स्थिती आहे. कोरानाच्या साथीची सुरुवात चीनमधील ज्या वुहान शहरातून झाली ते शहरातील जनजीवन येत्या ८ एप्रिलपासून पूर्वपदावर येणार आहे. चीन सरकारनेच त्या बाबतची माहिती दिली. युरोप, अमेरिकेसह अशिया खंडातील अनेक देश वेगाने लॉक डाऊनकडे (संपूर्ण व्यवहार ठप्प) जात आहे. जगभरातील पावणेदोनशे देशांमधे कोरोनाचा प्रसार झाला असून, युरोप आणि अमेरिकेमधील स्थिती गंभीर बनली आहे. हुबेई प्रांतातील वुहानमधून कोरोनाचा प्रसार सुरु झाला. तेथे गेल्या आठवडाभरामधे केवळ एक नवीन रुग्ण आढळला आहे. संपूर्ण चीनमधे गेल्या चोवीस तासांमधे नवीन ७८ बाधित रुग्ण आढळले आहे. चीनमधील कोरोनाची साथ आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. वुहानमधे कोरोनाची साथ पसरल्याचे लक्षात आल्यानंतर जानेवारी महिन्याच्या मध्यावर शहर बंद करण्यात आले होते. येथील स्थिती सुधारत असल्याने शहरातील व्यवहार ८ एप्रिल पासून सुरु करण्यात येतील. तो पर्यंत वाहतुकीवर निर्बंध कायम असतील. चीनने वुहान शहराला हिरव्या यादीत स्थान दिले आहे. स्थानिक नागरिक त्या प्रांतामधे फिरु शकतील. त्यासाठी नागरिकांना स्थानिक प्रशासनाने दिलेले डिजिटल आरोग्य प्रमाणपत्र दाखवावे लागेल. मात्र, शळा, महाविद्यालये आणि संस्था मात्र बंदच ठेवण्यात येणार आहेत. तसेच, स्थानिक उत्पादन संस्था आणि व्यवहार सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चायना डेली या वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे. वुहान मधील आरोग्य अधिकाºयांनी ब्रिटनसह साथ रोगाच्या नियंत्रणासाठी झटणाऱ्या सर्व देशातील आरोग्य अधिकारी आणि कर्मचाºयांना दक्षता घेण्याची सूचना केली आहे. उपचार करताना योग्य तो पोषाख घालण्याची सूचना केली आहे. चीनने सुरुवातीला संपूर्ण सुरक्षा असलेला पोषाख न करताच उपचार केले होते. ते टाळण्याचे आवाहन चीनमधील मेडिकल अधिकाºयांनी केले आहेत.--------------जागतिक आरोग्य संघटना काय म्हणतेयभारत, चीन आणि अमेरिकेसह वीस देशांचा समावेश असलेल्या जी-२० देशांना आरोग्य रक्षक वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन वाढविण्याची सूचना जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. अमेरिकेतील नागरिकांनी गर्दीची ठिकाणे टाळावी अशी सूचना देखील केली आहे. अमेरिकेतील बाधितांचा आकडा वाढत असल्याने आरोग्य सेवेवर ताण येत असल्याने गर्दी टाळण्याची सूचना त्यांनी केली आहे. 

 

टॅग्स :Puneपुणेchinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्याEnglandइंग्लंडAmericaअमेरिका