शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : बस कोरोना! थोड्या काळासाठी तरी गुन्हेगारी सोडा; अमेरिकी पोलिसांनी हात जोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 19:06 IST

Coronavirus : अमेरिकेतील सुमारे 40 राज्यांमध्ये सार्वजनिक शाळा, बार, रेस्टॉरंट्स बंद करण्यात आले आहेत. 

ठळक मुद्देसध्या कोरोना विषाणूमुळे परिस्थिती गंभीर बनत आहे, अशा परिस्थितीत सर्व प्रकारच्या गुन्हेगारी कारवाया थांबवाव्यात असे आम्ही आवाहन करतो. फ्यूलिप पोलिसांप्रमाणेच ओहिया, उटाह, वॉशिंग्टनसह १२ शहरांमध्ये किंवा राज्य पोलीस प्रशासनाच्यावतीने सोशल मीडियावरही अशा प्रकारे आवाहन करणारे पोस्ट करण्यात आले आहे.

अमेरिका - कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यामुळे बर्‍याच क्षेत्रांतील कामावर परिणाम होत आहे. पोलिसांपासून डॉक्टरांपर्यंत प्रत्येकजण यावेळी लोकांना वाचविण्याचा आणि त्यांना सतर्क करण्याचा प्रयत्न करीत आहे. हे लक्षात घेता अमेरिकेतील बर्‍याच राज्यांच्या पोलिसांनी ज्यांची चर्चा जगभरात आहे अशा कोरोनाबाबत गुन्हेगारांना आवाहन केले आहे. पोलीस सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारांना आवाहन करीत आहेत की, जोपर्यंत कोरोनाचा कहर आहे, तोपर्यंत कोणताही गुन्हा करु नका.फ्यूलिप पोलीस विभागाकडून ट्वीटद्वारे असे आवाहन करण्यात आले आहे की, सध्या कोरोना विषाणूमुळे परिस्थिती गंभीर बनत आहे, अशा परिस्थितीत सर्व प्रकारच्या गुन्हेगारी कारवाया थांबवाव्यात असे आम्ही आवाहन करतो. गुन्हेगारी कमी करण्यासाठी आम्ही आपल्या सहकार्याचे आभार मानतो. जेव्हा परिस्थिती सामान्य असेल, तेव्हा आम्ही आपल्याला सांगू आणि मग आपण आपले काम सुरू करा.

फ्यूलिप पोलिसांप्रमाणेच ओहिया, उटाह, वॉशिंग्टनसह १२ शहरांमध्ये किंवा राज्य पोलीस प्रशासनाच्यावतीने सोशल मीडियावरही अशा प्रकारे आवाहन करणारे पोस्ट करण्यात आले आहे.अमेरिकेत सतत वाढत आहे कोरोनाचा प्रादुर्भाव विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत अमेरिकेत कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत येथे 6500 हून अधिक पॉझिटिव्ह कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे, तर मृतांचा आकडा 100 च्या वर गेला आहे. कोरोना प्रभाव कमी करण्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने युरोपियन देशांतील विमान कंपन्यांवर बंदी घातली आहे.  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कोरोनामुळे देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी शक्यतो घरीच राहावे आणि आवश्यकतेनुसारच घरातून बाहेर पडावे. अमेरिकेतील सुमारे 40 राज्यांमध्ये सार्वजनिक शाळा, बार, रेस्टॉरंट्स बंद करण्यात आले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडियाAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प