शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
2
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
3
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
4
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
5
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
6
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
7
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
8
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
9
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
10
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
11
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
12
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
13
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
14
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
15
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
16
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
17
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
18
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
19
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
20
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: काय सांगता? 'या' देशात हात धुण्यासाठी वापरली जातेय चक्क दारू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 17:26 IST

आता आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता सरकारने रुग्णालयांमध्ये सॅनिटायझरऐवजी अल्कोहोल वापरण्याची परवानगी दिली आहे.

टोकियो: कोरोना व्हायरसचा जपानमध्येही झपाट्याने प्रसार होत आहे. आतापर्यंत 8,100 रुग्णांची नोंद झाली आहे, तर 147 लोकांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. जपानमध्ये पीपीई, मास्क, हातमोजे आणि सॅनिटायझर्सची मोठ्या प्रमाणात कमतरता भासू लागली आहे. जपानमधल्या अनेक रुग्णालयांमध्ये सॅनिटायझर्स संपले आहे. आता आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता जपान सरकारने रुग्णालयांमध्ये सॅनिटायझरऐवजी अल्कोहोल वापरण्याची परवानगी दिली आहे.जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, कोरोनावर उपचार करणार्‍या वैद्यकीय कर्मचार्‍यांना सॅनिटायझरऐवजी अल्होकोलही वापरता येऊ शकते. देशात सॅनिटायझर्सची कमतरता असून, अल्कोहोल मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. डॉक्टरांचा असा विश्वास आहे की, 70% पेक्षा जास्त अल्कोहोलयुक्त मद्यानं सॅनिटायझर केले जाऊ शकते. जपानमधल्या काही व्होडक्याच्या ब्रँडमध्ये एवढ्या प्रमाणात अल्कोहोल असते. तर जपानमध्ये मिळणाऱ्या इतर मद्यात 22 ते 45% टक्के इतकं अल्कोहोल असतं.जपानी माध्यमांच्या म्हणण्यानुसार, सॅनिटायझरच्या टंचाईनंतर काही मद्य कंपन्यांनी अशी दारू तयार करण्यास सुरुवात केली आहे, ज्यात 70 टक्क्यांपेक्षा जास्त अल्कोहोल आहे. काही जपानी कंपन्या अजूनही सॅनिटायझर अमेरिकेत निर्यात करतात, पण फारच कमतरता भासू लागल्यास त्यावर निर्बंधही लादले जाऊ शकतात. जपानमध्ये तयार करण्यात येणाऱ्या सॅनिटायझर्सच्या माध्यमातून 76 ते 81% टक्के विषाणूपासून मुक्तता मिळत असल्याचा दावा केला जात आहे.जपानी लोकांना बार, क्लब आणि रेस्टॉरंट्सपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पंतप्रधान शिंजो आबे, राष्ट्रीय कोरोना व्हायरस टास्क फोर्सच्या बैठकीत म्हणाले, "ज्या ठिकाणी लोक रात्रीचे जातात त्या ठिकाणी संसर्ग होण्याच्या अनेक घटनांची घडल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तो देशभर पसरला आहे." जपानमध्ये 7 एप्रिल रोजी लॉकडाऊन करण्यात आलं असून, ज्यावर कोणतीही दंडात्मक तरतूद नाही. परंतु लोकांना शक्य तितक्या घरीच राहण्यास सांगितले गेले आहे. आबे यांनी पुन्हा कंपन्यांना कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी देण्यास सांगितलं आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या