शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

CoronaVirus: रुग्णाला शोधणार, जंतूनाशकही फवारणार; स्मार्ट रडार 'लय भारी' कामगिरी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 07:30 IST

इराणचे कमांडर इन चिफ हुसेन सलामी यांनी नुकताच असा दावा केला आहे, की आम्ही नुकतेच एक उपकरण तयार केले आहे. त्यामुळे तब्बल शंभर मीटर परिघातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शोधून काढता येतील.

कट्टर इस्लामिक देश म्हणून इराण ओळखला जातो. संपूर्ण जग कोरोनाशी झुंजत असताना इराणलाही आपल्या अपुऱ्या आरोग्य सुविधांसह कोरोनाशी लढा द्यावा लागतो आहे. जगात सगळ्यात जास्त ज्या देशांत कोरोनानं हाहाकार माजविला त्या प्रमुख देशांत इराणचा सध्या आठवा क्रमांक लागतो. त्यांच्याकडे आतापर्यंत ८४ हजार ८०२ कोरोनाचे रुग्ण सापडले असून, त्यातील ५२९७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर ६०,९६५ लोक बरे होऊन घरी गेले आहेत, असा इराणचा दावा आहे.इराण व अमेरिका यांचे संबंध आधीच ताणलेले आहेत. आपल्या देशांतर्गत समस्यांनी इराण त्रस्त आहे. त्यात कोरोनानं त्यांच्याकडे उच्छाद मांडलाय. मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे. विज्ञानापेक्षाही पारंपरिकतेकडे इराणचा अधिक ओढा आहे. अशा काळात विज्ञानाच्या मदतीनं त्यांनाही आशेचा किरण दिसला आहे. इराणनं नुकताच दावा केला आहे की, कोणाकडूनही मदत मिळत नसली, तरी काय झालं, आम्ही कुठल्याही संकटांना तोंड देण्यास व आपत्तींचा धैर्यानं मुकाबला करण्यास सज्ज आहोत.इराणचे कमांडर इन चिफ हुसेन सलामी यांनी नुकताच असा दावा केला आहे, की आम्ही नुकतेच एक उपकरण तयार केले आहे. त्यामुळे तब्बल शंभर मीटर परिघातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शोधून काढता येतील.हे यंत्र आपल्याभोवती चुंबकीय लहरी निर्माण करतं आणि त्यामुळे शंभर मीटर परिघातील कोरोना व्हायरसनं संक्रमित असलेलं कोणतंही क्षेत्र शोधता येऊ शकतं. या प्रकियेला केवळ पाच सेकंद लागतात, असाही त्यांचा दावा आहे. ‘आयआरजीसी’ (इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स) आणि त्याचे प्रमुख हुसेन सलामी यांचं म्हणणं आहे, हे यंत्र दूर अंतरावरून, दुरस्थपणे कार्यरत होत असले, तरी त्याची अचूकता ८० टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. आम्ही या यंत्राची बऱ्याच ठिकाणी चाचणी घेतली आहे व ते परिणामकारक सिद्ध झाले आहे. दाट वस्तीच्या ठिकाणी या यंत्राचा चांगला उपयोग होणार आहे.हे उपकरण स्मार्ट जंतुनाशक म्हणून तर काम करेलच, पण कोणत्या भागात मोठ्या प्रमाणात जंतुनाशक फवारणीची गरज आहे, हेही त्यामुळे कळेल. केवळ कोरोनाच नव्हे, इतर कोणत्याही विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी या उपकरणाचा उपयोग होऊ शकेल, असा दावाही ‘आयआरजीसी’नं केला आहे. मोठा गाजावाजा करून या उपकरणाचं अनावरण केलं असलं तरी हे उपकरण कितपत उपयोगी आहे, याबाबत शंका व्यक्त होत आहे. सोशल मीडियावरही यावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. इराणमधील काही नागरिकांनीही यावर शंका व्यक्त केली असून, इराणच्या या दाव्यावर ‘हसावं की रडावं’ असा प्रश्न पडला आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या