CoronaVirus: कोरोनाचा उगम शोधा, नाहीतर कोविड-26, कोविड-32 साठी तयारी करा; शास्त्रज्ञांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 05:05 PM2021-05-31T17:05:12+5:302021-05-31T17:05:56+5:30

world needs the cooperation of the Chinese government to trace the origins of Covid-19 : कोविड 19 च्या उगमाचा शोध घेण्यासाठी आणि भविष्य़ातील महामारींचा धोका रोखण्यासाठी चीनच्या सरकारने जगाची मदत करायला हवी.

CoronaVirus: Find the origin of the corona, otherwise prepare for Covid-26, Covid-32; US experts warn | CoronaVirus: कोरोनाचा उगम शोधा, नाहीतर कोविड-26, कोविड-32 साठी तयारी करा; शास्त्रज्ञांचा इशारा

CoronaVirus: कोरोनाचा उगम शोधा, नाहीतर कोविड-26, कोविड-32 साठी तयारी करा; शास्त्रज्ञांचा इशारा

Next

CoronaVirus origin: कोरोना व्हायरस कुठून आला? यावर साऱ्या जगाचे बोट चीनच्या वुहान लॅबकडे (Wuhan lab) आहे. जगभरात याची चर्चा सुरु असून चिंता देखील वाढली आहे. अमेरिकेची मीडिया कंपनी ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार कोरोना व्हायरसच्या (CoronaVirus) उत्पत्तीवरून अमेरिकेच्या दोन वैज्ञानिकांनी मोठा इशारा दिला आहे. कोविड-19 च्या उगमाचा शोध घ्या नाहीतर कोविड-26 आणि कोविड-32 साठी तयार रहा, असे म्हटले आहे. (Find Covid-19 Origin Or Face "Covid-26 And Covid-32", Warn US Experts)


अमेरिकेच्या तत्कालीन डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनचे कमिशनर राहिलेले स्कॉट गॉटलीब आणि टेक्सासच्या चिल्ड्रन्स हॉस्पिटल सेंटर फॉर व्हॅक्सिन डेव्हलपमेंटचे सहाय्यक संचालक पीटर होट्स यांनी हा इशारा दिला आहे. महत्वाचे म्हणजे गॉटलीब हे सध्या कोरोना लस आणलेल्या फायझरच्या संचालक मंडळावर आहेत. 


कोविड 19 च्या उगमाचा शोध घेण्यासाठी आणि भविष्य़ातील महामारींचा धोका रोखण्यासाठी चीनच्या सरकारने जगाची मदत करायला हवी. गॉटलीब यांच्या म्हणण्यानुसार चीनच्या लॅबमधूनच कोरोनाचा जन्म आणि प्रसार झाल्याचा जगाच्या दाव्यांना आणखी काही ठोस पुरावे सापडले आहेत. याचसोबत चीनने हे पुरावे खोटे ठरविण्यासाठी काहीच माहिती दिलेली नाहीय. तर होट्सनी म्हटले की, ज्या पद्धतीने कोरोना पसरला आहे त्यानुसार भविष्यात देखील महामाऱ्या पसरण्याचा धोका वाढला आहे. 


चीन भलेही वुहानमधून कोरोना व्हायरस लीक झाल्याचे नाकारत असला, तरी याचे पुरावे आणखी प्रबळ होत चालले आहेत. अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओनी चीनचे लष्कर वुहान लॅबच्या या कामांमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला आहे. चीनच्या या लॅबमध्ये मिलिट्रीशी संबंधीत हालचाली होत आहेत. त्याला सिव्हिलियन रिसर्च म्हटले गेले आहे. चीनने याबाबत डब्ल्युएचओला देखील माहिती देण्यास नकार दिला होता. 

Web Title: CoronaVirus: Find the origin of the corona, otherwise prepare for Covid-26, Covid-32; US experts warn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.