शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

Coronavirus : चीनमध्ये कमी रुग्ण; इटली आणि इराणमध्ये हाहाकार, परदेशी प्रवाशांवरही घातली बंधने

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 6:49 AM

इटलीमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या २७ हजार ९८0 झाली असून, या आजाराने आतापर्यंत २१५८ जणांचा बळी घेतला आहे.

बीजिंग/रोम : चीनमधील कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची आणि मृत्यू पावणाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी होत असली तरी इटलीमध्ये मात्र त्यात वाढ होत आहे. इटलीमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या २७ हजार ९८0 झाली असून, या आजाराने आतापर्यंत २१५८ जणांचा बळी घेतला आहे.जगभरातील १४५ देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला आहे आणि एकूण मृत्यूंची संख्या सात हजारांवर गेली आहे. या आजाराचे जगात १ लाख ८३ हजार रुग्ण असल्याची माहिती देण्यात आली. अमेरिका, चीनसह सर्व देशांनी परदेशांतून येणाºया प्रत्येक प्रवाशाला १४ दिवसांसाठी विलगीकरण कक्षात ठेवायला सुरुवात केली आहे.कोरोनाचा हाहाकार आॅगस्टपर्यंत सुरूच राहील, अशी भीती अमेरिकेने व्यक्त केली आहे. अमेरिकेत कोरोनाने आतापर्यंत ८५ जणांचा बळी घेतला आहे आणि रुग्णांची संख्या ४५00 झाली आहे. या संसर्गजन्य आजारामुळे संपूर्ण अमेरिकेत अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. शाळा व महाविद्यालये तसेच विद्यापीठे बंद करण्यात आली आहेत. तसेच रेस्टॉरंट्स, बार व करमणुकीच्या कार्यक्रमांवरही सरकारने बंदी घातली आहे.इटलीमध्ये या आजारातून बरे झालेल्यांची संख्या २७४९ आहे. तसेच कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता २३ हजार ७३ असून ४,९0७ जणांचे वैद्यकीय अहवाल येणे बाकी आहे. एकूण रुग्णांपैकी २१,२२२ जणांना कोरोनाची किरकोळ लागण झाली असून, २८५२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या पाच दिवसांपासून इटलीतील औषधांची दुकाने व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, कंपन्या, कार्यालये, बाजारपेठा, रेस्टॉरंट्स, बार पूर्णत: बंद आहेत.चीनमध्ये मंगळवारी एकाच व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. मात्र परदेशांतून आलेल्या २0 जणांना लागण झाल्याचे सांगण्यात आले. चीनमध्ये आज १३ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाच्या बळींची संख्या ३२२६ झाली आहे. मात्र चीनच्या अनेक प्रांतांमध्ये लोकांना घराबाहेर पडण्यास निर्बंध आहे. ठराविक वेळेतच लोकांना खरेदीसाठी बाजारात जाण्याची संमती आहे. ठराविक दुकाने व मॉल काही वेळेसाठीच खुली ठेवली जात आहेत. (वृत्तसंस्था)इराणमध्ये ८५३ मृतपाकिस्तानात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १८९ वर गेली आहे. त्यापैकी १५५ रुग्ण एकट्या सिंध प्रांतात आहेत. या प्रांताच्या सीमा इराणला लागून आहे आणि इराणमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला आहे. इराणमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या १५ हजारांहून अधिक असून, मृत्यू पावलेल्यांचा आकडा आता ८५३ झाला आहे.युरोपीय संघाच्या सीमा बंदयुरोपीय देशांमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सर्व देशांनी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. सीमा बंद केल्यामुळे युरोपीय संघ म्हणून एकत्र येण्याला अर्थच राहिलेला नाही, अशी तेथील नागरिकांची तक्रार आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी युरोपीय देशांतून येणाऱ्यांना बंदी घातली आहे.... तर ब्रिटन उद्ध्वस्त होईललंडन: कोरोनाचा संसर्ग युरोपमधील इटली, स्पेन, फ्रान्सनंतर ब्रिटनमध्ये होत असून, या संसर्गजन्य आजाराने ब्रिटन उद्धवस्त होईल, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. द गार्डियन या वृत्तपत्राने शास्त्रज्ञांचा हवाला देऊ न म्हटले आहे की, ब्रिटनला पुढील किमानएक वर्ष कोरोनाच्या संसर्गाशी सामना करावा लागणार आहे. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सिस्टीमच्या अहवालानुसार, वर्षभरात ब्रिटनमधील सुमारे ८0 लाख लोकांना कोरोनाची लागण होण्याची भीती आहे.

स्पेनमध्ये 9000 रुग्णस्पेनमध्ये करोनाचा संसर्ग वाढत असून, एका दिवसात तिथे एक हजारहून अधिक नवीन रुग्ण आढळले. तिथे रुग्णांची संख्या सुमारे ९ हजार असून, आतापर्यंत २९७ जण मरण पावले आहेत. माद्रिदमध्ये चार हजारांहून अधिक लोकांना लागण झाली आहे. देशात आरोग्य सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा, मॉल, रेस्टॉरंट्स बंद आहेत. देशातील साडेचार कोटी लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. औषधे व खाद्यपदार्थ घेण्यासाठीच लोकांना बाहेर जाण्याची परवानगी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीय