CoronaVirus जीडीपी ४.८ टक्क्यांवर घसरण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 05:27 AM2020-04-10T05:27:18+5:302020-04-10T05:28:08+5:30

संयुक्त राष्ट्रांचा अहवाल : कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेलाही फटका

CoronaVirus Fear of falling GDP at 4.8% | CoronaVirus जीडीपी ४.८ टक्क्यांवर घसरण्याची भीती

CoronaVirus जीडीपी ४.८ टक्क्यांवर घसरण्याची भीती

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
संयुक्त राष्ट्रे : कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची गती कमी होणार असून, भारताचे एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) ४.८ टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता संयुक्त राष्टÑांनी जाहीर केलेल्या एका अहवालामध्ये व्यक्त करण्यात आली आहे.
‘इकॉनॉमिक अ‍ॅण्ड सोशल सर्व्हे ्रआॅफ एशिया अ‍ॅण्ड पॅसिफिक (एस्केप)२०२०’ असे या सर्वेक्षणाचे नाव आहे. त्यामध्ये आशिया प्रशांत क्षेत्रातील देशांवर कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या आर्थिक परिणामांचा अभ्यास करण्यात आला आहे.
२०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये भारताचे एकूण देशांतर्गत उत्पादन कमी होऊन ४.८ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. याआधी हे उत्पादन ५ टक्के राहण्याचा अंदाज होता. सध्या उपलब्ध असलेल्या अतिशय प्रारंभिक माहितीवर हे निष्कर्ष काढण्यात आले असून, यापुढील काळामध्ये त्यात बदल होण्याची शक्यता असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसचा प्रभाव अद्यापही ओसरलेला नसून त्याचा अर्थव्यवस्थेवर अजून किती परिणाम होईल, ते आताच सांगता येणार नसल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. कमी झालेले औद्योगिक उत्पादन, देशामध्ये कमी प्रमाणात येत असलेली गुंतवणूक त्याचबरोबर वाढत असलेले बेरोजगारीचे प्रमाण याचा परिणामही अर्थव्यवस्थेवर होणार असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेचा विकास दर अधिक प्रमाणात कमी होण्याची भीती या अहवालामध्ये व्यक्त केली गेली आहे.
या संकटामुळे व्यापार, पर्यटन आणि गुंतवणूक या क्षेत्रांवर मोठा विपरित परिणाम होणार असल्याचे या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. याशिवाय विविध देशांमध्ये असलेले नजीकचे सहकार्य आणि त्यांचे एकमेकांवर असलेले आर्थिक अवलंबित्व यामुळे आर्थिक संकट आणखी वाढण्याची भीतीही यामध्ये व्यक्त झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे आशिया प्रशांत क्षेत्राला बसणारा फटका हा ०.६ ते ०.८ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही रक्कम १३२ ते १७२ दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढी असण्याची शक्यता आहे. ही रक्कम केवळ व्यापारामध्ये झालेल्या कपातीमुळे असल्याचे या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. २०१८मध्ये या विभागाचा विकास दर ५.३ टक्के होता, तो २०१९ मध्ये ४.३ टक्क्यांवर आला आहे.

औषध उद्योगही येणार अडचणीत
भारतामधील औषधनिर्मिती उद्योगही अडचणीत येण्याची शक्यता आहे. या उद्योगासाठी लागणारा कच्चामाल हा मोठ्या प्रमाणात चीनमधून येत असतो. चीनमधील मोठ्या लॉकडाउनमुळे तेथील उत्पादन ठप्प झाल्याने भारतातील औषधनिर्मिती उद्योगाला कच्च्यामालाची टंचाई जाणवण्याची शक्यताही या अहवालामध्ये वर्तविण्यात आली आहे.

Web Title: CoronaVirus Fear of falling GDP at 4.8%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.