शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

CoronaVirus: एमिरेट्सच्या विमानात आता असेल दोन प्रवाशांत रिकामे सीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 07:09 IST

कर्मचाऱ्यांसाठी नवा सुरक्षित गणवेश; खाद्यपदार्थ आणि पेये (बेव्हरिजेस) दिली जातील बेंटो-स्टाईल्ड बॉक्सेसमध्ये

दुबई : कोरोना विषाणूचा (कोविड-१९) फैलाव रोखण्यासाठी एमिरेटस कंपनीच्या विमानात दोन प्रवाशांत किंवा कुटुंबाच्या गटांमध्ये रिकाम्या सीटस असतील आणि कॅबिन बॅगेजही नेण्यास परवानगी नसेल. याशिवाय कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मास्क, ग्लोव्हज, गाऊन व हेल्मेट असा नवा गणवेश वापरणार आहे. कोविड-१९ चा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी दोन प्रवाशांमध्ये किंवा कुटुंबाच्या गटांत रिकाम्या सीट आधीच ठेवल्या जातील, असे दुबईस्थित या विमान कंपनीने निवेदनात म्हटले.कोविड-१९ चा उद्रेक झाल्यानंतर एमिरेटस कंपनीने तिची बरीच प्रवासी उड्डाणे रद्द केलेली असून, आता हळूहळू कामकाज सुरू करीत आहे. दुबईबाहेर जाणाºया प्रवाशांची चाचणीही कंपनीने सुरू केलेली आहे. प्रवाशांशी थेट संबंध येणारे कॅबिन क्रू, बोर्डिंग एजंटस् आणि ग्राऊंड स्टाफ आता वैयक्तिक सुरक्षा उपकरणात (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट-पीपीई) दिसतील. त्यांच्या मूळ गणवेशाच्या वर प्रोटेक्टिव्ह डिस्पोसेबल गाऊन असेल. याशिवाय सेफ्टी व्हिझर, मास्क व ग्लोव्हज असतील, असे त्यात म्हटले आहे.दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारे सगळे ग्राहक व कर्मचाºयांसाठी ग्लोव्हज आणि मास्क अनिवार्य आहे आणि सगळे प्रवासी व कर्मचारी यांचे तापमान थर्मल स्कॅनर्सद्वारे तपासले जाईल. चेक इन आणि बोर्डिंगच्या वेळी दोघांमध्ये अंतर राखले गेले आहे की, नाही हे दर्शवणारी यंत्रे (इंडिकेटर्स) मैदानावर व प्रतीक्षालय भागांत बसवण्यात आली आहेत. प्रवाशांना चेक इनपासून ते विमानातून उतरेपर्यंत संपूर्ण प्रवासात मास्क व ग्लोव्हज वापरणे बंधनकारक आहे. विषाणूचा फैलाव स्पर्शाद्वारे होऊ नये म्हणून कंपनीने कोणतेही मासिक किंवा छापील साहित्य वापरण्यास तात्पुरती बंदी घातली आहे. प्रवाशांना लॅपटॉप, हँडबॅग, ब्रिफकेस किंवा बाळांसाठीचे आवश्यक सामानच बरोबर नेता येईल. एमिरेटसने आरोग्य आणि सुरक्षेच्या कारणांसाठी विमानातील सेवांमध्येही सुधारणा केल्या आहेत.खाद्यपदार्थ आणि पेये (बेव्हरिजेस) पूर्वीप्रमाणेच दिली जातील; परंतु आता ती बेंटो-स्टाईल्ड बॉक्सेसमध्ये. क्रू आणि प्रवासी यांच्यात कमीतकमी संपर्क यावा, असा उद्देश यामागे आहे. सँडविचेस, बेव्हरिजेस, स्नॅक्स आणि डेसर्टस् प्रवाशांना पर्सनल बॉक्सेसमध्ये मिळतील.प्रत्येक चेक इन डेस्कपाशी प्रवासी आणि कर्मचारी यांना कामकाजाच्या वेळी अतिरिक्त सुरक्षा मिळावी यासाठी प्रोटेक्टिव्ह बॅरियर्स लावण्यात आले आहेत. एमिरेटस कंपनीने आपले प्रवासी आणि कर्मचारी यांचे आरोग्य आणि सुरक्षितता कोणतीही किंमत मोजून राखण्याचे ठरवले आहे.यामुळे फक्त कंपनीचे क्रू आणि इतर कर्मचाऱ्यांनाच प्रोत्साहन मिळेल, असे नाही तर प्रवाशांनाही ते विमानातून प्रवास करताना सुरक्षेच्या दर्जाची जाणीव होईल, असेही निवेदनात म्हटले आहे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या