शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

CoronaVirus: डोनाल्ड ट्रम्प WHO वर भडकले; म्हणाले, "चीनची खूपच बाजू घेताय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 20:13 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्य़क्ष डोनाल्ड़ ट्रम्प यांनी हा चीनी व्हायरस असल्याची टीका केली होती. यावर चीनने आक्षेप नोंदविला होता.

वॉशिंग्टन : जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार होण्यामागे कोणत्या देशाचा हात आहे,  हे साऱ्या जगाला पडलेले कोडेच आहे. परंतू अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये खटके उडू लागले आहेत. कारणही तसेच आहे. अमेरिकेत कोरोनाने हाहाकार माजविला असून दिवसाला १०-१० हजार कोरोनाग्रस्त रुग्ण सापडत आहेत. तर मृत्यूंचा आकडा हजारावर गेला आहे. 

अमेरिकेचे राष्ट्राध्य़क्ष डोनाल्ड़ ट्रम्प यांनी हा चीनी व्हायरस असल्याची टीका केली होती. यावर चीनने आक्षेप नोंदविला होता. यानंतर ट्रम्पनी चीनलाच जबाबदार धरत वेळीच कोरोनाची माहिती दिली असती तर हा व्हायरस रोखता आला असता, असा आरोप केला होता. आज ट्रम्प यांनी थेट जागतिक आरोग्य संघटना WHO लाच लक्ष्य केले आहे. डब्लूएचओ चीनची खूप बाजू घेत आहे. जे कधीच योग्य नाहीय. जगातील लोक डब्लूएचओच्या वागण्यावरून नाराज आहेत. कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळविल्यावरून WHO चीनची स्तुती केली आहे. लोकांना हे चुकीचे वाटत आहे. WHO चीनचीच बाजू घेत सुटले आहे, अशी टीका ट्रम्प यांनी पत्रकारपरिषदेत केली आहे.  

ट्रम्प यांचे हे वक्तव्य अशावेळी आले आहे जेव्हा WHO चे संचालक टेडरोस अधनोम हे चीनची बाजू घेतल्याने जगभराच्या लोकांच्या निशाण्यावर आहेत. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत २१ हजारहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर या व्हायरसने १९६ देशांना विळखा घातला असून ४ लाखांहून अधिक लोक संक्रमित झाले आहेत. 

चीनने या व्हायसरचा प्रसार केल्याच्या आरोपावर बाजू मांडली आहे. हा व्हायसर चीनमध्ये सापडलेला असला तरीही त्याची निर्मिती चीनने केलेली नाही. तसेच हा व्हायरस चीनने जगभरात पसरवलेला नाही. यामुळे चीनी व्हायरस किंवा वुहान व्हायरस असे शब्दप्रयोग चुकीचे आहेत. 

CoronaVirus: थँक्यू महिंद्रा! केवळ ४८ तासांत बनविले व्हेंटिलेटरचे प्रारूप; खर्च अवघा ७५०० रुपये

गुरुद्वारावर ISIS चा मोठा हल्ला; 27 शीखांचा गोळीबारात मृत्यू

चालता चालता चक्कर येऊन पडला; कोरोनाच्या भीतीमुळे रस्त्यावरच तडफडला

वैज्ञानिकांना दिसला आशेचा किरण; कोरोना व्हायरसनेच दिलीय मोठी संधी

भारत, अमेरिकेवर मंदीची टांगती तलवार; तरीही चीनसाठी 'मूड' चांगला

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाchinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या