शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनाला पुरून उरणारी लस तयार; भारताचा मित्र असलेल्या देशाच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 12:27 IST

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनासारख्या महामारीच्या उपचारासाठी अजूनही अधिकृत लसीचा शोध लागलेला नाही.

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. जगभरात आतापर्यंत 36 लाख 42 हजार 066 लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. यापैकी 2 लाख 52 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 11 लाख 93 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच मागील 24 तासांमध्ये 78377 नवे कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर 3,877 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी सर्व देशातील सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. तसेच कोरोनाच्या उपचारासाठी लसीची चाचणी देखील अनेक देशात करण्यात येत आहे. 

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनासारख्या महामारीच्या उपचारासाठी अजूनही अधिकृत लसीचा शोध लागलेला नाही. मात्र इस्रायलमधील संशोधकांना कोरोनावर मात करण्यासाठी लस तयार करण्यात यश आलं असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

इस्त्रायलचे संरक्षण मंत्री नफताली बेनेट यांनी सोमवारी दावा केला की देशाच्या संरक्षण जैविक संस्थेने कोरोना विषाणूची लस बनविली आहे. ते म्हणाले की कोरोनाला रोखण्यासाठी अँटीबॉडी तयार करण्यात संस्थेने मोठे यश संपादन केले आहे. तसेच कोरोना व्हायरस लसीला विकसित करण्याचा टप्पा आता पूर्ण झाला आहे. त्यामुळे संशोधक आता त्याच्या पेटंट आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादनाची तयारी करत असल्याची माहिती नफताली बेनेट यांनी दिली आहे.

नफताली बेनेट म्हणाले की, कोरोना व्हायरस लसीच्या विकासाचा टप्पा आता पूर्ण झाला आहे. डिफेन्स इन्स्टिट्यूट आता ही लस पेटंट करण्याच्या विचारात आहे. पुढील टप्प्यात, संशोधक व्यावसायिक उत्पादनासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी संपर्क साधतील.तसेच या महान यशाबद्दल मला संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा अभिमान असल्याचे देखील बेनेट यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे इस्रायलमधील संशोधकांच्या या दाव्यामुळे आता संपूर्ण जगाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे इस्रायलचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास भारत इस्रायलकडून तंत्रज्ञान घेईल असं सांगण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIsraelइस्रायलdocterडॉक्टरIndiaभारतAmericaअमेरिका