Coronavirus: Cuba's Doctor Army Helps Italy. | Coronavirus : क्युबाची डॉक्टर आर्मी धावली इटलीच्या मदतीला!

Coronavirus : क्युबाची डॉक्टर आर्मी धावली इटलीच्या मदतीला!

ठळक मुद्देआम्ही काही सुपरहिरो नाहीत, मात्र आमचं प्रशिक्षण, आणि आमचं कर्तव्य आम्हाला हे शिकवतं की आपली गरज जिथं आहे तिथं आपण मदतीला गेलं पाहिजे!’

क्युबा. हे नाव ऐकलं की आठवतो फिडेल कॅस्ट्रो.  50 वर्षे अमेरिकेच्या र्निबधांना न जुमानणारा क्युबाचा राष्ट्राध्यक्ष. क्युबा हा एवढुसा कम्युनिस्ट देश. अतिशय गरीब. पण आज जेव्हा सारं जग संकटात आहे तेव्हा हा एवढुसा देश आपल्या डॉक्टरांची फौज जगाच्या मदतीला पाठवतो आहे. अमेरिका जेव्हा कोरोना व्हायरसकडे चिनी पिडा म्हणून पाहत आहे, आपल्या देशातल्या लोकांनाह तिथली ांडवली व्यवस्था वा:यावर सोडू पाहतेय तिथं एवढुशा क्युबानं ते करुन दाखवलं आहे, ज्यामुळे विकसित देशांना त्यांचा हेवा वाटावा. क्युबानं एकेकाळी सोव्हिएट रशियाकडून मिळालेल्या मदतीच्या जोरावर उत्तम सार्वजनिक वैद्यकीय व्यवस्था उी केली. जगारात कुठंही संकट असो क्युबन डॉक्टरांची फौज ज्याला ‘आर्मीज ऑफ व्हाईट रॉब’ म्हणतात मदतीला धावून जाते. 1959 साली त्यांनी हैतीमध्ये कॉल:यावर उपचार करण्यासाठी आपली मेडिकल टिम पाठवली. 2क्1क् मध्ये पश्मिच आफ्रिकेत इबोलाची साथ आटोक्यात आणायलाही हीच फौज धावली. कॅरेबियन बेटांच्या मदतीलाही क्युबन वैद्यकीय पथक हजर असतं. व्हेनेझुएला, निकारानुआ, जमैका, सुरीनेम, ग्रेनेडा या देशांनाही क्युबानं मदत केली आहे.

मात्र आजवर मागास, गरीब देशात वैद्यकीय पथक पाठवणारा अजून एक गरीब देश अशीच क्युबाची टिंगल अनेक विकसित देशांनी केली. मात्र आज विकसित देशांच्या व्यवस्था उघडय़ा पडत असताना क्युबाने आपलं 52 जणांचं वैद्यकीय पथक इटलीच्या मदतीला रवाना केलं. उत्तम उपचार आणि अतीउत्तम आपत्ती व्यवस्थापन यासाठी क्युबन डॉक्टरांची तयारी वाखाणण्यासारखी आहे. श्रीमंत देशांना आज स्वत:ला सावरणं कठीण असताना क्युबासारखा देश मात्र आपली अत्यंत उत्कृष्ट, प्रशिक्षित माणसं इतरांच्या मदतीला पाठवत आहे, आणि त्याचं देशातली इतर माणसं स्वागत करत आहेत, हीच या काळात किती विलक्षण गोष्ट आहे.

आपल्या अतीउत्तम व्यवस्थेचा अािमान असलेल्या ब्रिटनने अलिकडेच क्युबाचे जाहीर आार मानले. 658 लोक असलेल्या ब्रिटिश जहाजाला आपल्या बंदरावर थारा द्यायला एकही देश तयार नसताना, क्युबानं त्या जहाजाला आसरा दिला. लोकांवर उपचार केले. ब्रिटनने क्युबाचे जाहीर वारंवार आार मानले. आता तुर्तास त्यांनी इतर देशांच्या लोकांना आपल्या सीमा बंद केल्या असल्या तरी जे देशात आहे, त्यांच्यासाठी सर्वतोपरी मदत स्थानिक सरकार करत आहे.

इटालीला रवाना झालेल्या पथकात असलेले 68 वर्षाचे डॉक्टर लिन्ड्रो फर्नाडिंस सांगतात, भि ती कुणाला वाटत नाही, आम्हालाही वाटते. मात्र भि ती वाटली म्हणून कर्तव्य करायचं नाही, असं तर नाही होऊ शकत. आम्ही काही सुपरहिरो नाहीत, मात्र आमचं प्रशिक्षण, आणि आमचं कर्तव्य आम्हाला हे शिकवतं की आपली गरज जिथं आहे तिथं आपण मदतीला गेलं पाहिजे!’

ही वृत्तीच नाही तर  उत्तम वैद्यकीय व्यवस्था हे क्युबाचं वैशिटय़ आहे. जगातल्या अनेक प्रगत देशांपेक्षा क्युबातली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उत्तम तर आहेच, मात्र संकटात, आपत्कालीन परिस्थितीत कसं काम करायचं, समाजातल्या अतीसामान्य घटकांर्पयतही आपली मदत कशी अचूक आणि वेळेत पोहोचेल यासाठीची यंत्रणा क्युबानं विकसित केलेली आहे. क्युबामध्ये सरासरी लोकसंख्येत दरडोई डॉक्टरांचं प्रमाणही जास्त आहे. आणि हे प्रशिक्षित डॉक्टर्स, अन्य आरोग्य कर्मचारी प्रत्येक घरी जाऊन अर्थात डोअर टू डोअर सेवा आजच्या या कोरोनाच्या संकटातही देत आहेत. क्युबाचा आदर्श जगानं घ्यावा आणि भांडवली व्यवस्थेत माणसाच्या जीवाचं आणि माणुसकीचं मोल जाणावं असं म्हणत जागतिक माध्यमं क्युबाचं कौतुक करत आहे.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus: Cuba's Doctor Army Helps Italy.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.