शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोनाचा संसर्ग झालेल्या डायबिटीसच्या रुग्णांसाठी ही बाब ठरतेय जीवघेणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 12:24 IST

डायबिटिस असलेल्या व्यक्तींना कोरोनाच्या संसर्गामुळे अधिक धोका असल्याचे तज्ज्ञांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झालेल्या डायबिटीसच्या रुग्णांमधील मृत्युदर हा तब्बल ४२ टक्के असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा संसर्ग झालेल्या डायबिटीसच्या रुग्णांमधील मृत्युदर हा तब्बल ४२ टक्के कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या बहुतांश डायबिटिसच्या रुग्णांची कोरोना चाचणी आली पॉझिटिव्ह

मुंबई - जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी सध्या युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. दरम्यान, डायबिटिस असलेल्या व्यक्तींना कोरोनाच्या संसर्गामुळे अधिक धोका असल्याचे तज्ज्ञांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झालेल्या डायबिटीसच्या रुग्णांमधील मृत्युदर हा तब्बल ४२ टक्के असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. मात्र डायबिटिसच्या रुग्णांनाही कोरोनाच्या संसर्गातून वाचवणे शक्य असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  

याबाबत तज्ज्ञांनी सांगितले की, ज्या व्यक्ती मधुमेहाने ग्रस्त आहेत, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला तर अशा परिस्थितीत आतापर्यंत ४२ टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र या मृत्यूंचे कारण कोरोना नव्हे तर शुगरचे वाढलेले प्रमाण ठरले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या बहुतांश डायबिटिसच्या रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, असे  वेस्टर्न केप हेल्थच्या संशोधकांनी म्हटले आहे. हे आकडे परदेशातील असले तरी भारतातही परिस्थिती चांगली असल्याची अपेक्षा बागळता येण्यासारखे चित्र नाही. जगातील इतर कुठल्याही देशापेक्षा अधिक डायबिटिसचे रुग्ण भारतात आहेत. त्यामुळे डायबिटीसच्या रुग्णांनी कोरोनाच्या संक्रमण काळात विशेष खबरदारी घेण्याची गरज आङे. तसेच कुठलीही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

डायबिटीसच्या ज्या रुग्णांनी सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या संसर्गाकडे लक्ष दिले नाही. अशा रुग्णांचा मृत्यू झाल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. जर या लोकांनी वेळीच संसर्गाकडे लक्ष दिले असते आणि वेळीच डॉक्टरकडे गेले असते तर त्यांची शुगर धोकादायक पातळीपर्यंत जाण्यापासून रोखता आले असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यMedicalवैद्यकीय