शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus :"आता कोरोना कधीच संपणार नाही, त्याच्यापासून मुक्तताही मिळणार नाही", न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचे हतबल उदगार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 16:21 IST

Coronavirus Update: कोरोना विषाणूच्या फैलावाने गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला वेठीस धरलेले आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमीजास्त होत असली तरी धोका अद्याप टळलेला नाही.

वेलिंग्टन - कोरोना विषाणूच्या फैलावाने गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला वेठीस धरलेले आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमीजास्त होत असली तरी धोका अद्याप टळलेला नाही. (Coronavirus Update) दरम्यान, न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी कोरोनाबाबत एक मोठे विधान केले आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डन  (Jacinda Ardern) यांनी कोरोनाच्या जागतिक साथीपासून पूर्णपणे सुटका होऊ शकत नाही, हे मान्य केले आहे. पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांनी ऑकलंडमध्ये लॉकडाऊन संबंधीच्या निर्बंधांमध्ये शिथिलता देतानासांगितले की, या साथीच्या सुरुवातीला न्यूझीलंडने कडक लॉकडाऊन लागू करत अन्य कठोर उपाय योजून कोरोनाला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्या म्हणाल्या की, आतापर्यंत न्यूझीलंडची ही रणनीती ५० लाख लोकसंख्या असलेल्या देशासाठी उपयुक्त ठरली होती. देशामध्ये संसर्गामुळे २७ जणांचा मृत्यू झाला आहे.

पंतप्रधान जेसिंडा यांनी सांगितले की, जेव्हा इतर देशांमध्ये मृतांची संख्या वाढत होती आणि लोकांचे दैनंदिन जीवन बाधित झाले होते. तेव्हा न्यूझीलंडमधील जनता आपल्या कार्यालयात, शाळांमध्ये आणि खेळांच्या मैदानात सर्वसामान्यपणे जात होते. मात्र ऑगस्टमध्ये ऑस्ट्रेलियातून आलेल्या एका व्यक्तीच्या डेल्टा व्हेरिएंट विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर पूर्ण चित्र बदलले. त्यांनी सांगितले की, देशामध्ये हा रुग्ण सापडल्यानंतर कठोर निर्बंध लागू करण्यात आले. मात्र हा संसर्गाला रोखण्यासाठी पुरेसा नव्हता. देशामध्ये सोमवारी संसर्गाचे २९ नवे रुग्ण सापडल्यानंतर बाधितांची संख्या वाढून १३०० पेक्षा अधिक झाली आहे. काही रुग्ण ऑकलंडच्या बाहेरही सापडले आहेत. मात्र ऑकडंलमध्ये लागू करण्यात आलेल्या सात आठवड्यांच्या निर्बंधांमुळे संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात मदत मिळाली आहे.

त्यांनी सांगितले की, या संसर्गाबाबत एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे दीर्घकाळ कठोर निर्बंध लागू केल्यानंतरही रुग्ण सापडणे थांबलेले नाही. मात्र संसर्ग पूर्णपणे रोखणे महत्त्वपूर्ण होते. कारण तेव्हा आमच्याकडे लस नव्हती. मात्र आता आमच्याकडे लस आहे. आता आपण रणनीती बदलू शकतो.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNew Zealandन्यूझीलंडHealthआरोग्य