CoronaVirus चीनने १८४ देशांना नरक बनविले; डोनाल्ड ट्रम्प भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 02:21 PM2020-04-29T14:21:29+5:302020-04-29T14:22:47+5:30

गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या मध्यावर हा व्हायरस चीनमध्ये आढळला होता. आतापर्यंत या व्हारसमुळे जगभरात दोन लाखांहून अधिक बळी गेले आहेत. सर्वाधिक मृत्यू अमेरिकेमध्ये झाले असून हा आकडा ६००००वर पोहोचला आहे.

CoronaVirus China made 184 countries like hell; Donald Trump angry hrb | CoronaVirus चीनने १८४ देशांना नरक बनविले; डोनाल्ड ट्रम्प भडकले

CoronaVirus चीनने १८४ देशांना नरक बनविले; डोनाल्ड ट्रम्प भडकले

googlenewsNext

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर कोरोना व्हायरसची माहिती लपविल्याचे आरोप केले होते. तसेच कोरोनाला चीनमध्येच रोखण्यात अपयशी ठरल्यावरून ट्रम्प यांनी चीनवर तोंडसुख घेतले आहे. चीनमुळे जगातील १८४ देशांमध्ये नरकासारखी स्थिती असल्याचा आरोप त्यांनी केला. अमेरिकी सदस्यांनी चीनवर खनिज आणि निर्माण क्षेत्रावर अवलंबित्व कमी करण्याची मागणी केली आहे. 


ट्रम्प यांनी कोरोनावरून थेट चीनवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. तसेच चीनलाच दोषी ठरवत त्यांनी तपासही सुरु केला आहे. त्यांनी जर्मनीने चीनकडे मागितलेल्या नुकसान भरपाईपेक्षा जबर नुकसानभरपाई घेण्याबाबत विचार करत असल्याचे स्पष्ट केले आहे. जर्मनीने चीनकडे १४० अरब अमेरिकी डॉलरची नुकसान भरपाई मागितली आहे. अमेरिका आणि युरोपसारख्या देशांमध्ये अशी भावना आहे की, चीनने आधीच या व्हायरसची माहिती जगाला दिली असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्थव्य़वस्थेला फटका बसला नसता. तसेच लाखांवर बळीही गेले नसते. 


ट्रम्प यांनी मंगळवारी व्हाईटहाऊसमध्ये प्रसारमाध्यमांना सांगितले की, कोरोनाने १८४ देशांमध्ये नरकयातना दिल्या आहेत. हे समजण्यापलिकडे आहे. या व्हायरसच्या उद्रेकाला मूळ स्थळावरच रोखले जाऊ शकले असते, जे चीनमध्ये होते. मात्र, तसे झाले नाही. आता हे १८४ देश नरकातून जात आहेत. 


गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या मध्यावर हा व्हायरस चीनमध्ये आढळला होता. आतापर्यंत या व्हारसमुळे जगभरात दोन लाखांहून अधिक बळी गेले आहेत. सर्वाधिक मृत्यू अमेरिकेमध्ये झाले असून हा आकडा ६००००वर पोहोचला आहे. अमेरिकेचे सदस्य ट्रम्प यांच्यावर दबाव वाढवत असून चीनवरील अवलंबित्व कमी करण्यात येण्याच्या मागणीसह चीनकडून जबर नुकसाना भरपाई वसूल करावी अशी मागणी केली आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

फोर्ड संकटात! तब्बल दोन अब्ज डॉलरचा तोटा; नुकसान पाच अब्जांवर जाण्याची भीती

CoronaVirus पुण्याच्या प्रसिद्ध कंपनीने घेतली मोठी 'रिस्क'; 1000 रुपयांत कोरोना लस आणणार

देशासाठी काहीपण! आजारी बालकासाठी रेल्वेने १५०० किमींचे अंतर कापत १ लीटर दूध पोहोचवले

Web Title: CoronaVirus China made 184 countries like hell; Donald Trump angry hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.