युरोप आणि रशियाने वाऱ्यावर सोडलं, चिनने केली किरगिझीस्तानला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 05:34 PM2020-04-27T17:34:18+5:302020-04-27T17:34:25+5:30

कोरोना आता जगाचं सत्ता संतुलनही बदलणार अशी चिन्हं आहेत.

coronavirus : /china help kyrgyzstan, russia & europe sidelined. | युरोप आणि रशियाने वाऱ्यावर सोडलं, चिनने केली किरगिझीस्तानला मदत

युरोप आणि रशियाने वाऱ्यावर सोडलं, चिनने केली किरगिझीस्तानला मदत

googlenewsNext
ठळक मुद्देस्थलांतरीतांचा प्रश्न गंभीर होतो आहे.

या देशाचं नाव भारतात तसं अनेकांनी ऐकलेलं असतं ते मेडिकलच्या संदर्भात. आपल्याकडचे अनेक विद्यार्थी तिकडे डॉक्टर व्हायला जातात. ज्यांना रशियात जायला जमत नाही, मिळत नाही ते तुलनेनं गरीब अशा या किरगिझीस्तान  देशात जातात. बिश्केक या राजधानीच्या शहरात जगभरातून आलेले अनेक तरुण विद्यार्थी शिकतात.
आता कोरोना कहर झाला तेव्हा तर एकटय़ा चंदीगडमधले 450 विद्यार्थी  किरगिझीस्तानात अडकल्याच्या बातम्या होत्या.
मात्र सध्या या देशाची अवस्था बिकट आहे. रशिया आणि युरोप यांना लागून असलेला हा ‘लॅण्ड लॉक’ देश. प्रत्येक गोष्टीसाठी शेजारच्या देशावर अवलंबून. बिश्केकही अनेक बाबतीत आजही मॉस्कोवर अवलंबून आहे.
गरीबी फार. विकास कमी. निसर्ग लहरी अशी अवस्था.
पेट्रोल पासून अन्नधान्यांर्पयत प्रत्येक गोष्ट शेजारी युरोप किंवा रशियातून येते.
तसा कोरोनाही आला.
आजच्या घडीला क्रिझगिस्तानात  665 लोकांना संसर्ग आणि 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
किरगिझीस्तानात आजच्या घडीला मोठं संकट आहे ते हाताला काम नसणा:या मजुरांचं. अकुशल कामगार इथं मोठय़ा संख्येनं. एरव्ही ते पोट भरायला जातात ते रशिया किंवा मग आखाती देशात.
तिकडे कोरोना कहर सुरु झाल्यावर अनेकजण परतले. त्यात आता सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यात ऑइल किंमत युद्ध पेटलं आहे, कोरोना कधी जाइल माहिती नाही, लोकांच्या हाताला काम नाही.
आता रशिया किंवा युरोपही या छोटय़ा देशाला मदत करायला तयार नाही कारण त्यांच्यासमोर त्यांचंच संकट आहे. एरव्ही युरोप या प्रदेशात आपल्याला काही ठामठोक भाव असावा म्हणून आर्थिक मदत करते पण आता युरोपही जर्जर आहे.
यासा:यात क्रिझगिस्तानला आर्थिक आणि वैद्यकीय मदत केली ती फक्त चिनने.
चीन आता कोरोनाच्या काठीने आपलं राजकीय वर्चस्व कुठं कुठं प्रस्थापित करता येइल, वाढवता येईल याचीही तयारी करतो आहे.
किरगिझीस्तानची माणसं मात्र आता मदतीसाठी अगतिक आहेत, त्यांना ना काम आहे, ना पैसा. स्थलांतरीतांचा प्रश्न गंभीर होतो आहे.
जगाचं सत्ता संतुलनही हा कोरोना बदलवणार अशी चिन्हं आहेत.

Web Title: coronavirus : /china help kyrgyzstan, russia & europe sidelined.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.