शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

CoronaVirus: धक्कादायक! कोरोनाची रहस्यमय माहिती असलेली चीनमधील प्रसिद्ध 'बॅट वुमन' अचानक गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 14:02 IST

तिच्याकडे कोरोना व्हायरससंदर्भात इत्थंभूत माहिती होती. चिनी माध्यमांनीच यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

ठळक मुद्देचीनमध्ये 'बॅट वुमन' या नावाने प्रसिद्ध असलेली वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी (डब्ल्यूआयव्ही)ची वैज्ञानिक रहस्यमय पद्धतीनं गायब झाली आहे. वुहानमधली ती लॅब आणि कोरोना विषाणूविषयी बरीच गुप्त माहिती तिच्याकडे असल्याची चर्चा आहे. वटवाघळांची आवड आणि त्यांच्यावरील संशोधनामुळे तिला हे नाव मिळालं आहे. वटवाघळांमध्ये असलेल्या विषाणूवरही ती संशोधन करत आहे.

बीजिंग: चीनमध्ये 'बॅट वुमन' या नावाने प्रसिद्ध असलेली वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी (डब्ल्यूआयव्ही)ची वैज्ञानिक रहस्यमय पद्धतीनं गायब झाली आहे. वुहानमधली ती लॅब आणि कोरोना विषाणूविषयी बरीच गुप्त माहिती तिच्याकडे असल्याची चर्चा आहे. कोरोनासंबंधी महत्त्वाची माहिती त्या बॅट वुमनकडे होती.  चीनमधील वुहान लॅबमध्ये काम करणारी शी झेंगिल हिला बॅट वूमन म्हटले जाते. वटवाघळांची आवड आणि त्यांच्यावरील संशोधनामुळे तिला हे नाव मिळालं आहे. वटवाघळांमध्ये असलेल्या विषाणूवरही ती संशोधन करत आहे. असं म्हणतात की, वुहानची लॅब आणि कोरोना विषाणूविषयी बरीच गुप्त माहिती तिनं पाश्चिमात्य देशांकडे उघड केली होती. तिच्याकडे कोरोना व्हायरससंदर्भात इत्थंभूत माहिती होती. चिनी माध्यमांनीच यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केलं आहे. बॅट वुमनबद्दल अनेक अफवाग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, पाश्चिमात्य देशांकडे कोरोनासंदर्भात माहिती उघड केल्याची ही अफवा पसरल्यानंतर शी झेंगिल हिनं सोशल मीडियावर याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. तिनं चीनच्या सोशल मीडिया वीचॅटवर लिहिले होते की, पाश्चिमात्य देशांना मी माहिती लीक केल्याची अफवा पसरवली गेली आहे. तरीही माझ्या मित्रांचं आणि माझ्या कुटुंबाचं सर्वकाही ठीक सुरू आहे. त्यानंतर तिने जवळपास 9 ताजी छायाचित्रेही पोस्ट केली. कितीही कठीण प्रसंग आले तरी अशी माहिती लीक होणार नाही. आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. विज्ञानावर दृढ विश्वास असल्याने मी असे ठामपणे म्हणू शकते की, एक दिवस सर्व ढग बाजूला सारून सूर्याचा प्रकाश स्पष्टपणे दिसणार आहे. काय खरंच, बॅट वुमननं लीक केली पाश्चिमात्य देशांकडे माहितीअशा अफवांमुळे ती त्रासलेली होती. वुहान लॅबच्या शास्त्रज्ञ शी झेंगिल हिनं पॅरिस दूतावासाला कोरोनासंदर्भात काही गुप्त माहिती दिली होती, अशा बातम्याही आंतरराष्ट्रीय मीडियानं दिल्या होत्या. परंतु शी झेंगील सध्या कुठे आहेत हे कोणालाही माहीत नाही. तिच्याबाबत सोशल मीडियावरही अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प हे सातत्यानं चीननं वुहान लॅबमधूनच कोरोना पसरवल्याचा आरोप करत आहेत. अनेक देशांनी चीनच्या भूमिकेवर संशयही व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरपासून ती बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये प्रथमच या विषाणूचा संसर्ग झाला होता. वुहानमधून तो व्हायरस जगभर पसरला. त्यानंतर आतापर्यंत शी झेंगिलची कोणतीही माहिती मिळालेली नाही. काही अहवालांमध्ये असे म्हटले जात आहे की, चीन सरकारने तिचे तोंड बंद केले आहे, कारण 2 जानेवारीला तिनी कोरोना विषाणूचे जीनोम उघड केले होते. काही अहवालांमध्ये असे म्हटले जात आहे की, तिनी पाश्चिमात्य देशांना यासंदर्भातील माहिती दिली होती. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

फेसबुकनंतर जिओचा आणखी एक मोठा करार; अमेरिकेच्या 'या' कंपनीसोबत मिळवला हात

Coronavirus: पीएम केअर्स फंडाला 151 कोटी देऊ शकता; मग मजुरांकडून तिकिटाचे पैसे का घेता?- राहुल गांधी

Coronavirus: घरी परतणाऱ्या मजुरांचा खर्च उचलणार काँग्रेस, सोनिया गांधींची मोठी घोषणा

Coronavirus: कोरोना लसीच्या आम्ही एकदम जवळ; डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितली 'वेळ'

होय, ते परत येताहेत; पण तिरंग्यात लपेटून; शहीद कर्नल शर्मा यांच्या पत्नीची आर्त भावना

एन्काऊंटरवेळी कर्नलच्या फोनवर दहशतवाद्यांनी म्हटलं अस्सलाम वालेकुम; अन्...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन