शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
2
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुडवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
5
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
6
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
7
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
8
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
9
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
10
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
11
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
12
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
13
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
14
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
15
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर
16
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
17
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
18
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
19
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
20
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

धक्कादायक! या देशामध्ये कोरोनाविरोधातील लस घेतलेल्या ५० टक्के लोकांना झाला कोरोनाचा संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 19:12 IST

Coronavirus In Britain: मोठ्या प्रमाणात लसीकरण केल्यानंतरही ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोके वर काडळे आहे. येथे कोरोनाविरोधातील लस घेतलेल्या प्रौढांमध्येही कोरोनाच्या संसर्गाचे रुग्ण खूप वेगाने वाढत आहेत.

लंडन - मोठ्या प्रमाणात लसीकरण केल्यानंतरही ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोके वर काडळे आहे. येथे कोरोनाविरोधातील लस घेतलेल्या प्रौढांमध्येही कोरोनाच्या संसर्गाचे रुग्ण खूप वेगाने वाढत आहेत. (Coronavirus In Britain) ब्रिटनमधील किंग्स कॉलेज लंडनचे वरिष्ठ व्हायरस ट्रॅकिंग स्पेशालिस्ट प्रा. टीम स्पेक्टर यांनी सांगितले की, ब्रिटनमध्ये कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. येथे एकूण ८७ टक्के बाधित लोक ते आहेत ज्यांनी कोरोनाची लस घेतलेली आहे. अशा परिस्थितीत आता १९ जुलैपासून ब्रिटनमध्ये पूर्णपणे अनलॉक करणे योग्य ठरणार का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. (In Britain, 50 percent of people who have been vaccinated have become infected with coronavirus)

ब्रिटनमध्ये ६ जुलै रोजी कोरोनाच्या १२ हजार ९०५ अशा रुग्णांचे निदान झाले होते ज्यांनी कोरोनावरील लस घेतलेली होती. त्यामुळे ६ जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह सापलडलेल्या रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण हे लसीकरण झालेल्या लोकांमधून सापडले. प्राध्यापक स्पेक्टर यांच्या अंदाजानुसार येत्या काळात हा आलेख अधिकच वर जाण्याची शक्यता आहे.

मात्र असे असले तरी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूच्या संबंधीचे सर्व निर्बंध १९ जुलै रोजी संपुष्टात येणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. जॉन्सन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, निर्बंध हटवल्यानंतर ब्रिटनमध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करणे आता आवश्यक नसेल.

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी जनतेला खबरदारी घेण्याची आणि वैयक्तिक जबाबदारीसह काम करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोरोनाची साथ संपुष्टात आली नसल्याचेही जॉन्सन यांनी सांगितले. ते म्हणाले की, आपण सोमवार म्हणजेच १९ जुलैपासून त्वरित सामान्य जीवनात परतू शकत नाही. लोक गर्दी असलेल्या इनडोअर ठिकाणी फेसकव्हरचा वापर करतील, अशी अपेक्षाही जॉन्सन यांनी व्यक्त केली.

दरम्यान, एनएचके वर्ल्डच्या रिपोर्टनुसार सरकारच्या या निर्णयाबाबत काही तज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे. जर विषाणूचा फैलाव होत असेल तर निर्बंध हटवणे हे धोकादायक ठरू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, डेल्टा विषाणूच्या फैलावास सुरुवात झाल्यापासून ब्रिटनमध्ये दररोज ३० हजारांहून अधिक रुग्ण सापडू लागले आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEnglandइंग्लंडHealthआरोग्य