सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन होऊ नये, यासाठी जर्मनीतील लोकांनी शोधला अजब फंडा, एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 11:53 AM2020-05-19T11:53:26+5:302020-05-19T11:53:48+5:30

त्यामुळे कोरोनाबरोबर न जगता कोरोनाला हरवायचे असेल तर अशा गोष्टीचा वापर करत संक्रमण रोखण्यास मदत होऊ शकते.

Coronavirus best idea use people in Germany for social distancing photo viral-SRJ | सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन होऊ नये, यासाठी जर्मनीतील लोकांनी शोधला अजब फंडा, एकदा पाहाच

सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन होऊ नये, यासाठी जर्मनीतील लोकांनी शोधला अजब फंडा, एकदा पाहाच

googlenewsNext

सर्वत्रच कोरोनाने थैमान घातले आहे. कितीही केले तरी कोरोना काही जायचे नाव घेत नाही. दिवसेंदिवस कोरोनाच्या संक्रमणाने लाखो लोकांचा जीव धोक्यात आहे. त्यामुळे अख्खे जग मार्च महिन्यापासूनच लॉकडाऊनमध्ये अडकले आहे. गेल्या ५० दिवसांहून अधिक काळ  लॉकडाऊनमुळेच लोक घरातच बंदिस्त आहेत. अशात किती दिवस अशा प्रकारे घरात बंदिस्त राहणार, असा प्रश्न सा-यांनाच पडला आहे. त्यामुळे अनेक देशात आता लॉकडाऊन उठवला आहे. अशात काही नियम त्यांनी लावले आहेत. घरातून बाहरे पडताना सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडू नये यासाठी आता लोकांनी एक आगळी -वेगळीच शक्कल लढवली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जावे यासाठी सोशल मीडियावर अनेक एक से बढकर एक भन्नाट आयडिया व्हायरल होत आहेत.

 
अशात आणखीन एक मजेदार फोटो समोर आला आहे. यात अगदी प्रमाणात कमी संख्येत रेस्टॉरंटमध्ये लोक बसलेले पाहायला मिळत आहेत. मात्र डिस्टन्स मेटेंन राहावे यासाठी लोकांनी आपल्या डोक्यावर वेगवेगळ्या आकारातील स्विमिंग पूल नूडल्स लावल्या आहेत. ज्याद्वारे सोशल डिस्टन्सिंग राखलं जाईल. रेस्टॉरंटने आपल्या फेसबुक पेजवरून हा फोटो शेअर केला आहे. जर्मनीतील हा फोटो असून तिथे अशाच प्रकारे भन्नाट आयडिया शोधत संक्रमण होण्यास आळा बसेल अशा युक्त्या लढवल्या जात आहेत.

हा फोटो समोर येताच नेटिझन्सने देखील या आयडियाचे समर्थन केले आहे. अशाच प्रकारे स्वतःची काळजी घेणे आता ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे फक्त हात धुवून आणि घरातच बसून काही होणार नाही. त्यासाठी आता एक पाऊल पुढे टाकत आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोनाबरोबर न जगता कोरोनाला हरवायचे असेल तर अशा गोष्टीचा वापर करत संक्रमण रोखण्यास मदत होऊ शकते.

Web Title: Coronavirus best idea use people in Germany for social distancing photo viral-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.