CoronaVirus : कोरोनाच्या लढ्यासाठी अमेरिकेनं उघडला खजिना; भारताला देणार भरघोस मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 11:06 AM2020-03-28T11:06:30+5:302020-03-28T11:11:55+5:30

भारतात शुक्रवारी आणखी चौघांचा मृत्यू झाल्याने कोविड-19 रोगाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 20वर पोहोचली असून, संसर्गित रुग्णांची संख्या 879 झाली आहे.

CoronaVirus : america announces 29 lakhs dollar aid for india to fight coronavirus vrd | CoronaVirus : कोरोनाच्या लढ्यासाठी अमेरिकेनं उघडला खजिना; भारताला देणार भरघोस मदत

CoronaVirus : कोरोनाच्या लढ्यासाठी अमेरिकेनं उघडला खजिना; भारताला देणार भरघोस मदत

Next

 वॉशिंग्टनः कोरोना व्हायरसनं जगभरातल्या अर्थव्यवस्था रसातळाला गेल्या आहे. विकसित देशांपासून विकसनशील देशांपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव पसरलेला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. अमेरिकेसाठी भरभक्कम पॅकेजची घोषणा केल्यानंतर ट्रम्प यांनी इतर देशांनाही लक्षणीय मदत करण्याची घोषणा केली आहे. भारतात शुक्रवारी आणखी चौघांचा मृत्यू झाल्याने कोविड-19 रोगाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 20वर पोहोचली असून, संसर्गित रुग्णांची संख्या 879 झाली आहे. कोरोनाच्या लढ्यासाठी अमेरिकेनं भारताला 2.9 मिलियन डॉलर म्हणजेच 21 कोटी 77 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. 

भारत आणि इतर 64 देशांना मदत करणार
विशेष म्हणजे अमेरिकेने भारताव्यतिरिक्त अन्य 64 देशांना 13 अब्ज रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. कोरोना विषाणूचा झपाट्यानं फैलाव होत असलेले हे देश आहेत. अमेरिकेने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, लॅबसमवेत इतर वैद्यकीय सुविधांवर उपचार करण्यासाठी ही रक्कम भारताला देण्यात आली आहे. भारताव्यतिरिक्त श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश आणि अफगाणिस्तानला आर्थिक सहाय्य जाहीर केले आहे. या प्रसंगी अमेरिकन अधिकारी बोनी ग्लिक म्हणाले, 'अनेक दशकांपासून, सार्वजनिक आरोग्यामध्ये द्विपक्षीय सहाय्य करणारा अमेरिका जगातील सर्वात मोठा देश आहे. अमेरिकेने लोकांचे प्राण वाचवले आहेत, असुरक्षित लोकांचे संरक्षण केले आहे, आरोग्य संस्था तयार केल्या आहेत आणि समुदाय आणि राष्ट्रांच्या स्थिरतेला चालना दिली आहे.

अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा एक लाखांच्या पार पोहोचला आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 1544 जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॅपकिंग विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात अमेरिकेत सुमारे 18 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 345 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 717 एवढा झाला आहे. दरम्यान, कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 ट्रिलियन डॉलरच्या मदत पॅकेजची घोषणा केली आहे. या मदत पॅकेजच्या माध्यमातून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला झालेल्या नुकसानीची भरपाई केली जाणार आहे. गेल्या चार दिवसात अमेरिकेत कोरोनाचे 50 हजार नवे रुग्ण आढळले आहेत. तर जगात आतापर्यंत 5 लाख 91 हजार 802 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 26 हजार 995 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 29 हजार 790 जण उपचारानंतर बरे झाले आहे. कोरोनाची लागण झालेल्याच्या यादीत इटली दुसऱ्या स्थानी आहे. इटलीत आतापर्यंत 86 हजार 498 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 9 हजार 134 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात इटलीत 919 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
 

Web Title: CoronaVirus : america announces 29 lakhs dollar aid for india to fight coronavirus vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.