शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

Coronavirus : पाकिस्तानात तबलिगी जमातचे ४२९ सदस्य संक्रमित; प्रसिद्ध मौलानाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 09:30 IST

इस्लामाबादमध्येही तबलिगी जमातशी संबंधित ९ कोरोना रुग्ण सापडले आहेत. 

ठळक मुद्देपाकिस्तानातल्या एकट्या सिंध प्रांतात तबलिगी जमात संघटनेचे ४२९ सदस्य कोरोना व्हायरसनं संक्रमित आढळले आहेत. या सर्व सदस्यांनी रायविंडमध्ये आयोजित इज्तामामध्ये सहभाग घेतला होता. त्याशिवाय पाकिस्तानात तबलिगी जमातचे प्रमुख असलेल्या मौलाना यांचासुद्धा कोरोनाच्या संक्रमणानं मृत्यू झाला आहे. इस्लामाबादमध्येही तबलिगी जमातशी संबंधित ९ कोरोना रुग्ण सापडले आहेत. 

इस्लामाबादः पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रायविंड शहरात तबलिगी जमातच्या कार्यक्रमानंतर देशभरात याचे सदस्य संक्रमित असल्याचं समोर येऊ लागलं आहे. पाकिस्तानातल्या एकट्या सिंध प्रांतात तबलिगी जमात संघटनेचे ४२९ सदस्य कोरोना व्हायरसनं संक्रमित आढळले आहेत. या सर्व सदस्यांनी रायविंडमध्ये आयोजित इज्तामामध्ये सहभाग घेतला होता. त्याशिवाय पाकिस्तानात तबलिगी जमातचे प्रमुख असलेल्या मौलाना यांचासुद्धा कोरोनाच्या संक्रमणानं मृत्यू झाला आहे. इस्लामाबादमध्येही तबलिगी जमातशी संबंधित ९ कोरोना रुग्ण सापडले आहेत. सिंध प्रांताचे मुख्यमंत्री सैय्यद मुराद अली शाह यांनी सांगितलं की, पंजाब प्रांतातील रायविंडमध्ये तबलिगी जमातच्या वार्षिक कार्यक्रमात भाग घेणाऱ्यांपैकी ४२९ सदस्य पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. कोरोनाचा संक्रमण पसरू नये, म्हणून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. त्याशिवाय तबलिगींशी संबंधित इतर सदस्यांचाही शोध सुरू आहे. मार्चमध्ये झालेल्या रायविंड भागातील या कार्यक्रमात ८० हजार लोक सहभागी झाले होते. त्यांचा आता पाकिस्तानातील प्रत्येक प्रांतात शोध घेतला जात आहे. प्रसिद्ध मौलाना सुहैब रूमी यांचे निधनपाकिस्तानमधील तबलिगींचे प्रसिद्ध मौलाना आणि फैसलाबादमधील तबलिगी जमातचे प्रमुख असलेल्या ६९ वर्षीय मौलाना सुहैब रूमी यांचे गुरुवारी कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर निधन झाले. फैसलाबादचे उपायुक्त मोहम्मद अली म्हणाले, 'मौलाना गेल्या महिन्यात लाहोरच्या रायविंडमध्ये तबलिगी जमातच्या कार्यक्रमात उपस्थित होते. दोन नातवंडांसह त्याच्या कुटुंबातील पाच सदस्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्याने सांगितले की, त्याला फैसलाबादपासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर एका स्वतंत्र कक्षात ठेवले गेले आहे.पंजाबमध्ये ११०० तबलिगी सदस्यांना झाला संसर्ग पंजाब आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, प्रांतातील तबलिगी जमातमधील ११००हून अधिक सदस्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. लाहोर मुख्यालयात गेल्या महिन्यात तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना शोधून काढले जात असून, त्यांना स्वतंत्र कक्षात ठेवले जात आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना कोरोना व्हायरसचं संक्रमण पसरण्याची कल्पना दिली होती, तरीसुद्धा लाहोरच्या रायविंड येथे तबलिगी जमातचा कार्यक्रम आयोजित केला होता. विशेष म्हणजे पंजाब प्रांतातील तुरुंगातही कोरोना पसरला असून, तिथे संक्रमित रुग्णांची संख्या १००च्या वर गेली आहे. पाकिस्तानात कोरोनाग्रस्तांची संख्या ७२६० एवढी असून, आतापर्यंत १३७ जणांचा मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या