शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: जगातील २७ कोटी लोक भूकबळीच्या वाटेवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 06:55 IST

तीस विकसनशील देशांना संयुक्त राष्ट्रसंघाचा इशारा

कोविड-१९! चीनमध्ये पहिल्यांदा या साथीच्या आजाराचा उगम झाल्यानंतर इतक्या झपाट्यानं संपूर्ण जगात त्याचा प्रसार होईल आणि अख्खं जग त्याच्या कचाट्यात सापडेल, याची कोणी कल्पनाही केली नव्हती. अमेरिकेसह बहुसंख्य देशांना वाटलं होतं, चीनमध्ये उगम झालेल्या या रोगाचा फटका केवळ चीनलाच बसेल, आपल्यापर्यंत तो येणार नाही; पण तसं झालं नाही. जगातल्या जवळपास प्रत्येक देशाला कोरोनाचा फटका बसला आहे. अनेक पातळ्यांवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे, पण सर्वांत मोठा परिणाम झाला आहे, तो लोकांच्या भुकेवर आणि अर्थातच त्यांच्या जगण्या-मरण्यावर!संयुक्त राष्ट्रसंघानंही त्याबाबत चिंता व्यक्त करताना जगाचं काय होईल, याबाबत प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. संयुक्त राष्ट्र संघाचं म्हणणं आहे, कोरोनाचा प्रभाव इतका प्रचंड असेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. कोरोनामुळे अख्ख्या जगालाच व्यापक दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. जगातल्या कोट्यवधी लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न मदत संस्थेचे प्रमुख व वर्ल्ड फूड प्रोग्रामचे कार्यकारी संचालक डेव्हीड बिसले यांनी तर जगाला इशारा देताना म्हटलं आहे, ‘विकसनशील जगातील तीसपेक्षा अधिक देशांत अन्नधान्याचा तीव्र दुष्काळ यामुळे पडण्याची शक्यता आहे. त्यातल्या दहा देशांत आधीच एक कोटीहून अधिक लोक उपाशी आहेत. ज्या लोकांना उपाशीपोटी झोपावं लागतंय त्यांच्याविषयी आम्ही बोलत नाही आहोत. आम्ही आताच्या आपत्कालीन परिस्थितीविषयी बोलतो आहोत. लोकं अक्षरश: उपासमारीच्या दिशेनं निघाले आहेत आणि दर दिवसागणिक मृत्यूच्या दाढेत ते ढकलले जात आहेत. या लोकांना जर आपण वेळेत अन्नधान्याचा पुरवठा करू शकलो नाही, त्यांना खायला मिळालं नाही, तर त्यांचं मरण अटळ आहे!’या तीस देशांतील जवळपास २७ कोटी लोक आजच मरणाच्या दारात उभे आहेत, असंही संयुक्त राष्ट्र संघाचं निरीक्षण आहे. डेव्हीड बिसले यांचं म्हणणं आहे की, कोरोना अजूनही आपले हातपाय पसरतोच आहे. कृती करायला आपल्याला फार थोडा वेळ आहे. आपण जर याबाबत फक्त विचारच करीत राहिलो आणि प्रत्यक्ष कृतीला थोडाही उशीर केला, तर या गरीब, भुकेकंगाल लोकांची कलेवरं पाहण्याशिवाय आपल्या हातात काहीच राहणार नाही.या अत्यंत बिकट परिस्थितीत या विकसनशील देशांपुढील आव्हान अतिशय बिकट आहे. त्यांना तर यावरचा पर्याय शोधून काढावा लागेल, युद्धपातळीवर त्यासाठी प्रयत्न करावेच लागतील, पण जगातल्या इतर देशांनीही या लोकांना मदत केली पाहिजे. या काळात कुठलाही भेदभाव, अपपरभाव प्रत्येकाच्या विनाशाला कारणीभूत ठरू शकतो. कोरोनाचा मुकाबला व त्याविरुद्धचा बचाव आम्ही एकट्यानंच करू शकतो, असा कुठल्याही देशाचा समज असेल, तर तो चुकीचा आहे, असंही संयुक्त राष्ट्र संघानं स्पष्ट केलं आहे.आज सुरुवातीला हे तीस देश सुपात आहेत, पण कालांतरानं इतर देशही त्याच वाटेवर येऊ शकतात, त्यामुळे एक व्हा, एकत्र या, एकमेकांना मदत करा, भुकेल्यांच्या पोटात किमान दोन घास जाऊ द्या.. हीच आजची तातडीची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या