शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाचा कहर! जगातील रुग्णांचा आकडा १ कोटीच्या पुढे; ५ लाखांहून अधिक मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 09:29 IST

जगातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ; अमेरिकेत २५ टक्के रुग्ण

ठळक मुद्देजगातील कोरोना रुग्णांचा आकडा १ कोटीच्या पुढेआतापर्यंत कोरोनाचे पाच लाख बळी; अमेरिकेतील परिस्थिती सर्वात वाईटअमेरिकेत २५ लाख रुग्णांची नोंद; सव्वा लाख नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई: जगातील कोरोना रुग्णांचा आकडा अतिशय झपाट्यानं वाढत आहे. चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनाचा फटका जवळपास सर्वच देशांना बसला आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीच्या पुढे गेली असून ५ लाखांहून अधिक जणांनी यामुळे जीव गमावला आहे.चीनच्या वुहानमधून जगभरात कोरोना विषाणू पसरला. सध्याच्या घडीला जगभरात कोरोनाचे १ कोटीहून अधिक रुग्ण असल्याची आकडेवारी www.worldometers.info संकेतस्थळानं दिली आहे. सध्या जगात कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ८२ हजार ६१३ इतकी आहे. आतापर्यंत ५ लाख १ हजार ३०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्यांची संख्या ५४ लाख ५८ हजार ५२३ इतकी आहे. तर ४१ लाख २२ हजार ७८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.महासत्ता असलेल्या अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. जगातील कोरोना रुग्णांपैकी २५ टक्के रुग्ण एकच्या अमेरिकेत आहेत. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांचा आकडा २६ लाखांच्या आसपास पोहोचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख २८ हजार १५२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास ११ लाख रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या १४ लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अमेरिकेनंतर सर्वाधिक कोरोना रुग्ण ब्राझीलमध्ये आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाचे १३ लाख रुग्ण आहेत. ब्राझीलमध्ये ५७ हजारांहून अधिक जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. रशियामध्ये कोरोनाचे ६ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. तर मृतांचा आकडा ९ हजारांच्या जवळ पोहोचला आहे. भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येनं ५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे १६ हजारहून अधिक जणांचा बळी गेला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाBrazilब्राझीलrussiaरशियाIndiaभारत