शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

जगात १ लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग, बळींची संख्या ३४००

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 04:37 IST

चीनमध्ये कोरोनाचे नवे १४३ रुग्ण आढळून आले आहेत. जगभरात १ लाख लोकांना संसर्ग झाला आहे, तर ३४०० लोकांचा मृत्यू झाला आहे.

बीजिंग : चीनमध्ये कोरोनामुळे आणखी ३० जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या आता ३०४२ वर पोहोचली आहे, तर संसर्ग झालेल्या लोकांची संख्या ८०,५५२ वर पोहोचली आहे. चीनमध्ये कोरोनाचे नवे १४३ रुग्ण आढळून आले आहेत. जगभरात १ लाख लोकांना संसर्ग झाला आहे, तर ३४०० लोकांचा मृत्यू झाला आहे.राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की, ३० पैकी २९ मृत्यू हे हुबेई प्रांतात झाले आहेत. तर, एका व्यक्तीचा मृत्यू हेनान प्रांतात झाला. १०२ संशयित रुग्ण समोर आले आहेत. यामुळे संशयित रुग्णांची संख्या वाढून ४८२ झाली आहे.चीनमध्ये गुरुवारपर्यंत ८०,५५२ लोकांना संसर्ग झाला आहे. २३,७८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५३,७२६ लोकांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. आयोगाने सांगितले की, गुरुवारी विदेशातून आलेल्या १६ लोकांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झालेआहे.यातील ११ लोक गांसू प्रांतातील आहेत. ४ जण बीजिंग आणि एक व्यक्ती शांघाईमधील आहे. यामुळे विदेशातून आलेल्या पीडितांची संख्या ३६ झाली आहे.अमेरिकेने ८.३ अब्ज डॉलरच्यामदतीचे विधेयक केले मंजूरअमेरिकेच्या उत्तर पश्चिम भागात कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढत असताना आणि बळींचा आकडा १२ वर पोहोचला असताना अमेरिकी संसदेने या रोगाशी लढण्यासाठी ८.३ अब्ज डॉलरचे आपत्कालीन विधेयक मंजूर करण्यात आले. हे विधेयक आता अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे स्वाक्षरीसाठी जाऊ शकते.अमेरिकेत कोरोनाचा पहिला रुग्ण जानेवारीत समोर आला होता, तर २९ फेब्रुवारी रोजी देशात या रोगाने पहिला मृत्यू झाला. कोरोना देशात १५ प्रांतात पसरला आहे, तर १८० पेक्षा अधिक लोकांना याचा संसर्ग झाला आहे.काही दिवसांत देशात १२ लाख टेस्ट किट वितरित करण्यात येणार आहेत, तर पुढील आठवड्यापर्यंत देशात ४० लाख आणखी किट वितरित करण्यात येणार आहेत. (वृत्तसंस्था)>जागतिक आरोग्य संघटनेचा इशाराकोरोनाला अनेक देश गांंभीर्याने घेत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. युरोप आणि अमेरिकेत या रोगाचा प्रकोप वाढला आहे.जागतिक बाजारपेठेवर परिणामांची चिंताही भेडसावत आहे. इटली, फ्रान्स, इराणमध्ये संसर्ग वाढत आहे, तर एक जहाज कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यापासून दूर ठेवण्यात आले आहे. तसेच जगातील ३० कोटी विद्यार्थ्यांना आपल्या घरी पाठविण्यात आले.सेनेगलमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या कर्मचाºयास संसर्गसेनेगलमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या कर्मचाºयास कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सेनेगलमध्ये आणखी दोन रुग्ण समोर आले आहेत.यात ब्रिटनमधील एका ३३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. सेनेगलमध्ये आतापर्यंत चार रुग्ण समोर आले आहेत.>इराणमध्ये फसलेल्यांचे नमुने विमानाने आणणारइराणमध्ये अडकलेल्या जवळपास ३०० भारतीय नागरिकांचे नमुने तपासणीसाठी विमानाने आणण्याचा निर्णय नागरी उड्डयण मंत्रालयाने घेतला आहे. या नागरिकांना संसर्ग झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.ज्या विमानाने भारतीय नागरिकांचे नमुने आणण्यात येणार आहेत त्याच विमानात भारतात अडकलेल्या दोन हजार इराणी नागरिकातून काही परतही जाणार आहेत. केंद्रीय नागरी उड्डयण सचिव पी.एस. खरौला यांनी सांगितले की, इराणमध्ये जवळपास २ हजार भारतीय फसले आहेत. यातील बहुतांश काश्मिरच्या कारगीलचे आहेत. तसेच, भारतातही इराणचे जवळपास २ हजार नागरिक आहेत.यातील बहुतांश लोक कोरोना पसरण्याच्या अगोदर येथे आले होते. ३०० भारतीयांचे नमुने येथे आणण्यात येतील. येथे प्रयोगशाळेत तपासणीनंतर ते जर कोरोनामुक्त असतील तर त्यांना विमानाने परत आणण्यात येईल.>व्हॅटिकनसिटीत कोरोनाचा पहिला रुग्णव्हॅटिकनसिटीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान, इराणचे विदेशमंत्री मोहम्मद जावेद यांचे सल्लागार हुसैन यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. इराणमध्ये आतापर्यंत १०७ जणांचा मृत्यू झाला असून ३५१५ जणांना संसर्ग झाला आहे. सॅन फ्रान्सिस्कोपासून जवळच रोखण्यात आलेल्या ग्रँड प्रिन्सेस या जहाजामधील प्रवाशांना आता तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे. गत प्रवासादरम्यान या जहाजातील एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता, तर अन्य चार जणांना संसर्ग झाला आहे. या जहाजावर ३५०० प्रवासी अडकले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना