शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus सात देशांमध्ये कोरोनाचे ६४ हजार बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 06:34 IST

लॉकडाउनच्या कालावधीतही मुंबईत कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. मागील २४ तासांत शहर-उपनगरात १०० कोरोना रु ग्ण आढळून आले आहेत.

नवी दिल्ली : जगात कोरोना बाधितांची संख्या १३ लाख, ७८ हजार,५२७ वर गेली असून आतापर्यंत या आजाराने ७८ हजार, ११० जणांचा बळी घेतला आहे.आजच्या घडीला सर्वाधिक म्हणजे ३ लाख, ७७ हजार, ५०० एवढे कोरोनाचे रुग्ण एकट्या अमेरिकेत असून गेल्या २४ तासांत तिथे ११ हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे. अमेरिकेत मृतांची संख्यादेखील वाढत असून मंगळवारी रात्रीपर्यंत आकडा ११ हजार, ८०० वर गेला. इटलीमध्ये मृतांची संख्या १६ हजार, ५२३ तर स्पेनमध्ये १३ हजार, ८०० वर गेली आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत ८ हजार, ९०० तर ब्रिटनमध्ये ६ हजार, १६० जण मरण पावले आहेत. इराण आणि चीन या दोन देशांमध्ये मिळून मृतांचा आकडा सुमारे ७ हजार झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत जे ७८ हजार लोकं मरण पावले त्यापैकी ६४ हजार जण या सात देशांमधीलच आहेत. मात्र, आतापर्यंत सुमारे तीन लाख रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.मुंबईत २४ तासांत १०० रु ग्ण वाढलेमुंबई : लॉकडाउनच्या कालावधीतही मुंबईत कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. मागील २४ तासांत शहर-उपनगरात १०० कोरोना रु ग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण रु ग्णांची संख्या मंगळवारी ६४२ वर पोहोचली. तर सहा मृत्यूंची नोंद झाली असून एकूण बळींची संख्या ४० झाली आहे.शहर-उपनगरातील १०० कोरोना रुग्णांपैकी ५५ रुग्ण प्रतिबंधात्मक क्षेत्रातील सहवासितांमध्ये मुंबई महापालिकेने घरोघरी जाऊन राबवलेल्या शोध मोहिमेमुळे, रुग्ण शोध क्लिनिक व संशयितांची योग्य वेळेस चाचणी केल्यामुळे सापडले आहेत. या सर्व सहवासितांची चाचणी करून त्यांचे विलगीकरण व उपचार सुरू करण्यात आले आहेत.आता पालिकेने कोविड क्लिनिक सुरू केले असून शोध, तपासणी व उपचार या त्रिसूत्रींद्वारे वेगाने संशयित, सहवासितांचा शोध घेतला जात आहे.१८५ संशयितांचे नमुने : प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये संशयित कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी विशेष क्लिनिक सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी डॉक्टर, परिचारिका व प्रयोगशाळा तंत्रज्ञ नेमण्यात आले आहेत. सोमवारपर्यंत २० क्लिनिक सुरू करण्यात आले. त्यात ६१४ पैकी १८५ संशियतांचे नमुने घेण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस