शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Omicron : लंडनमध्ये ओमायक्रॉनचा हाहाकार, 'या' लोकांवर येतेय ICU मध्ये जाण्याची वेळ; एक गोष्ट कॉमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 00:32 IST

लंडनमध्ये, ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंखेमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या लोकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे थंडीचा हंगाम लक्षात घेता येथील आयसीयूची क्षमताही दुप्पट करण्यात येत आहे.

जगभरात ओमायक्रॉनच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, याचा सर्वाधिक फटका यूकेला बसला आहे. यामागचे एक मुख्य कारण, येथे अनेक लोकांनी अद्यापही लस घेतलेली नाही, असेही सांगितले जात आहे. रॉयल लंडन रुग्णालयाच्या आयसीयूमधील डॉक्टर प्रोफेसर रुपर्ट पिअर्स यांनी म्हटले आहे, की काही रुग्ण असेही आहेत, जे रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांकडे ताबडतोब लस टोचण्याची विनंती करत आहेत. ते म्हणाले, रुग्णालयात दाखल झालेले बहुतांश कोरोना रुग्ण असे आहेत, ज्यांना अद्यापही लस मिळालेली नाही आणि त्यांचे वय 20 ते 30 वर्षे आहे.

लंडनमध्ये लसीकरणाचा दर सर्वात कमी आहे, संपूर्ण यूकेमध्ये 82 टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे. या तुलनेत लंडनमध्ये केवळ 61 टक्के लोकांनीच लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. बीबीसी रेडिओ कार्यक्रमाला दिलेल्या मुलाखतीत प्रोफेसर पिअर्स म्हणाले, 'आमच्याकडे आयसीयूमध्ये असलेल्या सर्व रुग्णांपैकी 80 ते 90 टक्के लोकांचे लसीकरण झालेले नाही. मात्र, कोरोनाचे असेही काही रुग्ण येत आहेत, ज्यांना लस मिळाली आहे. आमच्याकडे आता जेवढे रुग्ण येत आहेत, त्यांनील बहुतेक रुग्ण, आता आम्हाला लस घेता येईल का? असे विचारत आहेत.

लंडनमध्ये, ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंखेमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या लोकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे थंडीचा हंगाम लक्षात घेता येथील आयसीयूची क्षमताही दुप्पट करण्यात येत आहे. गरज भासल्यास कार पार्किंगमध्येही फील्ड हॉस्पिटल तयार करण्याची योजना आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ओमायक्रॉनच्या बहुतेक रुग्णांमध्ये सध्या केवळ सौम्य लक्षणे दिसत आहेत. यामुळे त्यांना सामान्य  वॉर्डमध्येच ठेवले जात आहे. भारतालाही 'या' गोष्टीवर द्यावं लागेल लक्ष -भारतातही ओमायक्रॉन बाधितांची सख्या सातत्याने वाढत आहेत, यामुळे ब्रिटनमधील परिस्थिती लक्षात घेत, भारतातही नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस शक्य तेवढ्या लवकर देणे आवशक आहे. यामुळे भलेही संसर्गाचा धोका पूर्णपणे संपणार नाही. पण तो लसीकरण झालेल्या लोकांनी गंभीर आजारी करत नाही.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसOmicron Variantओमायक्रॉनLondonलंडनEnglandइंग्लंड