शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Corona Virus : भीषण, भयावह! जपानमध्ये कोरोनाचा विस्फोट; आठवी लाट ठरतेय खतरनाक, परिस्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 21:02 IST

Corona Virus : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. असं असताना जपानमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. जपान कोरोनाच्या आठव्या लाटेचा सामना करत आहे. देशात बुधवारी कोरोनामुळे जे मृत्यू झाले त्याचा आकडा हा सर्वाधिक असल्याचं समोर आलं आहे. एका दिवसात ४१५ लोकांनी आपला जीव गमावला आहे. 

वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जपानमध्ये आतापर्यंत २८७६४२२३ रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत ५६२२८ जणांचा मृत्यू झाला आहे. जपानमध्य कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे २६०००० हे ऑगस्टमध्ये समोर आले होते. जपानची राजधानी टोकियोमध्यो कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. 

टोकियोमध्ये ३९२५०३८ रुग्ण सापडले आहेत. यानंतर ओसाकामध्ये २५०३७८६ आणि कानागावामध्ये १९४५४९२ रुग्ण आढळून आले आहे. याशिवाय आइची, सैतामा, फुकुओका, चीबी, ह्योगो आणि होक्कोइदोमध्ये देखील रुग्ण सातत्याने  वाढत आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, गेल्या सात दिवसांत जपानमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे आढळून आले आहेत. अमेरिकेनंतर आता जपानमध्ये कोरोना मृतांचा आकडा हा सर्वात जास्त आहे. चीनने पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJapanजपान