शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

पाकिस्तानात कोरोनाचा पहिला बळी, संसर्गग्रस्तांचा आकडा 184 वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 16:22 IST

इम्रानला सोमवारी रात्री लाहोरमधील मायो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आले तेव्हा तो बेशुद्धावस्थेत होते. मंगळवारी सकाळी त्याचे निधन झाले, अशी माहिती रुग्णालयातील सुत्रांनी दिली.

ठळक मुद्देहफीजाबाद येथील रहिवासी होता मृत इम्रानपाकिस्तानात 24 तासांत तब्बल 130 हून अधिक जणांना कोरोनाची लागण पाकिस्तानात कोरोना संसर्ग झालेल्यांचा आकडा 184 वर

इस्लामाबाद - आता यूरोप बरोबरच आशिया खंडातही कोरोना व्हायरसने पाय पसरायला सुरुवात केली आहे. आज पाकिस्तानातकोरोना व्हायरसने पहिला बळी घेतल्याची नोंद झाली. कोरोनामुळे पाकिस्तानच्या लाहौरमध्ये मंगळवारी सकाळी इम्रान नावाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तो हफीजाबाद येथील रहिवासी होता. पाकिस्तानात अचानकपणे कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ झाली आहे.

इम्रानला सोमवारी रात्री लाहोरमधील मायो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आले तेव्हा तो बेशुद्धावस्थेत होते. मंगळवारी सकाळी त्याचे निधन झाले, अशी माहिती रुग्णालयातील सुत्रांनी दिली. पाकिस्तानात गेल्या 24 तासांत तब्बल 130 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे संपूर्ण पाकिस्तानात भीतीचे वातावरण असून कोरोना संसर्ग झालेल्यांचा आकडा 184 वर पोहोचला आहे.

पाकिस्तानात ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला तो ईरानमधून आला होता. तो 14 दिवस सीमा भागातच देखरेखित होता. मात्र लाहोरमधील मायो रुगणालयात त्याचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानातील सिंद्धप्रांताला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथे एकून 155 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

करोनाचा सामना करण्यास इम्रान सरकार अपयशी ठरल्याने त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. करोनाची लागण झालेले बरेच रुग्ण इराणमधून आलेले आहेत. 

सिंद्धमध्ये 150 जमांना कोरोनाची लागण - पाकिस्‍तानातील परिस्थिती इम्रान खान यांच्य दाव्यांपेक्षा पूर्ण पणे भिंन्न आहे. येथील सिंध प्रांत हा कोरोनाचा गड बनत चालला आहे. येथे सर्वाधिक 150 जमांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय खैबर पख्‍तूनख्‍वामध्ये 15, बलुचिस्‍तानमध्ये 10, पंजाबमध्ये 2, राजधानी इस्‍लामाबादमध्ये 2, तर गिलगिट-बाल्टिस्‍तानमध्ये कोरोचाचे 5 रुग्ण आढळले आहेत. पाकिस्‍तानात गेल्या 24 तासांत कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या तीनपट वाढली आहे. यातील तब्बल 115 रुग्ण एकट्या सिंध प्रांतात आढळले आहेत.

कोरोनामुळे दोन डॉक्टकही संक्रमित -सिंध प्रांताचे मुख्‍यमंत्री मुराद अली यांनी जनतेला शांततेचे आव्हान केले आहे. पाकिस्‍तानची आर्थिक राजधानी म्हणवल्या जाणाऱ्या कराचीत कोरोनाचे 30 रुग्ण आढळले आहेत. पाकिस्तानात कोरोना ग्रस्तांवर उपचार करणारे डॉक्टरही सुरक्षित नाहीयेत. येथे दोन डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानIranइराण