शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
6
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
7
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
8
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
9
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
10
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
11
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
12
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
13
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
14
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
15
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
16
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
17
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
18
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
19
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
20
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव

Corona vaccine : कोरोनाविरोधात केवळ एक डोस पुरेसा ठरणार, १८ वर्षांवरील व्यक्तींना देता येणार, या कंपनीच्या लसीला मिळाली मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 11:18 IST

Corona vaccine News : आता एक अशी लस उपलब्ध झाली आहे जिचा केवळ एकच डोस कोरोनाविरोधात प्रतिकारशक्ती विकसित करण्यासाठी पुरेसा ठरणार आहे. (EU approved Johnson & Johnson's vaccine)

ठळक मुद्देजॉन्सन अँड जॉन्सनने ही लस विकसित केली आहे. या लसीला युरोपीयन युनियनच्या औधष नियामकाने मान्यता दिली आहेफायझर-बायोएनटेक, एस्ट्राजेनेका-ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि मॉडर्नाच्या लसींनंतर युरोपियन युनियनकडून मान्यता मिळालेली जॉन्सन अँड जॉन्सनची लस ही कोरोनावरील चौथी लस कोरोनावरील इतर लसींचे दोन डोस घ्यावे लागतात. मात्र या लसीचा केवळ एक डोस घ्यावा लागणार

ब्रुसेल्स - एकीकडे जगभरातील कोरोना रुग्णांच्या (Coronavirus) संख्येत चढउतार होत असताना दुसरीकडे कोरोनावरील  लसीही (Corona vaccine ) आता उपलब्ध होऊ लागल्या आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या बहुतांश कोरोना लसींचे दोन डोस घ्यावे लागतात. मात्र आता एक अशी लस उपलब्ध झाली आहे जिचा केवळ एकच डोस कोरोनाविरोधात प्रतिकारशक्ती विकसित करण्यासाठी पुरेसा ठरणार आहे. (Johnson & Johnson's Covid-19 vaccine)  जॉन्सन अँड जॉन्सनने ही लस विकसित केली आहे. या लसीला युरोपीयन युनियनच्या औधष नियामकाने मान्यता दिली आहे.  (Corona vaccine: Only one dose of corona will be sufficient, can be given to persons above 18 years of age, EU approved Johnson & Johnson's vaccine )

फायझर-बायोएनटेक, एस्ट्राजेनेका-ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि मॉडर्नाच्या लसींनंतर युरोपियन युनियनकडून मान्यता मिळालेली जॉन्सन अँड जॉन्सनची लस ही कोरोनावरील चौथी लस ठरली आहे. कोरोनावरील इतर लसींचे दोन डोस घ्यावे लागतात. मात्र या लसीचा केवळ एक डोस घ्यावा लागणार आहे.  तसेच १८ वर्षांवरील व्यक्तींना ही लस देण्यात येणार आहे. 

युरोपियन मेडिसिन एजन्सी (ईएमए)च एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर एमर कूक यांनी सांगितले की, या लसीला मान्यता मिळाल्यामुळे युरोपियन युनियनमधील देशांना कोरोनाविरोधात लढण्यासाठी आणि आपल्या लोकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी एक अतिरिक्त पर्याय प्राप्त होणार आहे. ईएमएनंतर युरोपियन कमिशननेसुद्धा लसीला अंतिम मंजुरी दिली आहे. अमेरिका, कॅनडा आणि बहरीनमध्येसुद्धा जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला मंजुरी मिळाली आहे.   जॉन्सन अँड जॉन्सनचे मुख्य सॅंटिफिक ऑफिसर पॉल स्टोफेल्स यांनी कंपनीसाठी हे मोठे यश असल्याचे म्हटले आहे. कंपनीने ईयूसह यावर्षी किमान २० कोटी डोसची पूर्तता करण्याबाबत तयारी दर्शवली आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्यmedicinesऔषधं