Corona Vaccination: या देशांमध्ये होणार मुलांचे लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 06:26 AM2021-06-05T06:26:50+5:302021-06-05T06:27:06+5:30

१२ वर्षे वयापुढील मुलांचे लसीकरण करण्यासाठी मंजुरी किंवा मंजुरी देण्याच्या विचारात असलेले देश

Corona Vaccination Children will be vaccinated in these countries | Corona Vaccination: या देशांमध्ये होणार मुलांचे लसीकरण

Corona Vaccination: या देशांमध्ये होणार मुलांचे लसीकरण

Next

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेचा इशारा दिला जाऊ लागला आहे. तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असेल, असेही सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी आपल्याकडच्या लहानग्यांचे लसीकरण कसे केले जाईल, याचा आराखडा बांधण्यास सुरुवात केली आहे. 

अमेरिका खंड
चिली : १२ ते १६ वयोगटातील मुलांना फायझर-बायोएन्टेक लस देण्यास ३१ मे रोजी चिली सरकारने मंजुरी दिली
अमेरिका : अमेरिकेत १२ ते १५ वयोगटातील मुलांचे मे महिन्याच्या मध्यापासून लसीकरण सुरू झाले.
कॅनडा : १२ ते १५ वयोगटातील मुलांना फायझरची लस देण्याची मंजुरी कॅनडा सरकारने मे महिन्यात दिली आहे

युरोपीय देश
ब्रिटन : फायझरने १२ ते १५ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची परवानगी ब्रिटिश सरकारकडे मागितली आहे
नॉर्वे : कोरोनाचा गंभीर धोका असलेल्या मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य द्यायचे नॉर्वे सरकारचे उद्दिष्ट आहे
स्वित्झर्लंड : १२ ते १५ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी फायझरला मे महिन्यात परवानगी दिली आहे

युरोपीय संघातील देश
इटली : १२ ते १५ वयोगटातील मुलांना फायझर-बायोएन्टेक लस देण्यास सरकारने मंजुरी दिली आहे
जर्मनी : १२ ते १६ वयोगटातील मुलांना ७ जूनपासून लस देण्यास सुरुवात केली जाणार आहे. पोलंडमध्येही याच दिवसापासून मुलांचे लसीकरण केले जाणार आहे
लिथुआनिया : या महिन्यापासून १२ वर्षे वयावरील मुलांचे लसीकरण केले जाईल, असे लिथुआनियाच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे
फ्रान्स : या महिन्याच्या मध्यापासून फ्रान्समध्ये १६ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला प्रारंभ होणार आहे. तर शाळा सुरू होईल तेव्हापासून १२ ते १५ वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जाणार आहे 
इस्टोनिया : हिवाळ्यात सर्व मुलांचे लसीकरण केले जाणार आहे
रोमानिया : १ जूनपासून १२ वर्षे वयावरील मुलांच्या लसीकरणास सुरुवात झाली
ऑस्ट्रिया : ऑगस्ट अखेरपर्यंत १२ ते १५ वयोगटातील ३.४० लाख मुलांचे लसीकरण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे
हंगेरी : १६ ते १८ वयोगटातील मुलांचे मे महिन्याच्या मध्यापासून लसीकरण सुरू झाले.

मध्य पूर्वेकडील देश
इस्रायल : जानेवारी महिन्यातच इस्रायलने १६ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास प्रारंभ केला. आता १२ ते १५ वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जाणार आहे
दुबई : १ जूनपासून १२ ते १५ वयोगटाील मुलांना फायझर-बायोएन्टेक लस देण्यास सुरुवात झाली आहे

आशिया-प्रशांत महासागर
सिंगापूर : १ जूनपासून १२ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली 
जपान : १२ वर्षांवरील मुलांचे लसीकरण करण्यास सरकारने २८ मे रोजी मंजुरी दिली
फिलिपाइन्स : २६ मे रोजी फिलिपाइन्स सरकारने १२ ते १५ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला मंजुरी दिली

Web Title: Corona Vaccination Children will be vaccinated in these countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.