शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर १० महिने ठेवल्यास अधिक फायदेशीर? ऑक्सफोर्डचा नवा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 15:13 IST

45-week gap between 2 Covishield doses boosts immunity: दोन डोसमधील इम्युनिटीचा काळ आणि कोरोनाच्या नवा व्हेरिएंटपासून संरक्षणासाठी बूस्टर डोस आवश्यक आहे की नाही हे स्टडी रिपोर्टमधून निश्चित करण्यात मदत होणार आहे.

ठळक मुद्देलसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवल्यास लसीकरण कार्यक्रमालाही चालना मिळेल. दोन डोसमध्ये अंतर राखल्यास जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करता येईल. या लसीच्या तिसऱ्या डोसनंतर मानवी शरीरात रोगप्रतिकारशक्ती अनेक पटीने वाढू शकतात.

गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोनाचं संकट उभं राहिलं आहे. कोरोनापासून बचावासाठी सध्या लसीकरण हा एकमेव उपाय आहे. त्यातच लसीच्या दोन डोसमधील अंतर किती ठेवावं याबाबत अनेक संशोधन सुरू आहे. लस उत्पादन करणारी कंपनी ऑक्सफोर्डने अलीकडेच त्यांचा अभ्यास अहवाल समोर आणला आहे. या अहवालात एस्ट्राजेनेका लसीच्या(AstraZeneca Vaccine) दोन डोसमधील अंतर १२ आठवड्यांऐवजी ४५ आठवडे केल्यास अथवा १० महिन्याचं अंतर ठेवल्यास ही लस शरीरात अत्यंत प्रभावी काम करत असल्याचा दावा केला आहे.

इतकचं नाही तर या स्टडी रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, या लसीच्या तिसऱ्या डोसनंतर मानवी शरीरात रोगप्रतिकारशक्ती अनेक पटीने वाढू शकतात. ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची ही लस भारतात सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविशील्ड(Covishield) नावानं दिली जाते. ऑक्सफोर्डच्या या स्टडीत सहभागी स्वयंसेवकांचं वय १८ ते ५५ वयोगटातील आहे. एस्ट्राजेनेका लसीच्या पहिल्या डोसनंतर जवळपास १ वर्ष शरीरात अँन्टीबॉडी तयार होतात. मात्र २८ दिवसानंतर शरीरातील अँन्टिबॉडीची जी पातळी होती ती १८० दिवसानंतर निम्म्यावर आली. तर दुसऱ्या डोसनंतर अँन्टिबॉडी पातळी एका महिन्यानंतर ४ ते १८ पटीने वाढली. दुसऱ्या डोसनंतर ६ महिन्यांनी बूस्टर म्हणून तिसरा डोस दिला तर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटविरोधात शरीरात लसीचा अधिक प्रभावी आणि सकारात्मक परिणाम दिसत असल्याचं म्हटलं आहे.

बूस्टर डोसची आवश्यकता आहे?  

ऑक्सफोर्ड लसीची चाचणी घेणारे प्रमुख संशोधक एंड्रयू पोलार्ड म्हणाले की, हे खरंच सत्य आहे, स्टडीचा डेटा पाहिला तर आपण ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेका लसीचा आणखी एक डोस देऊन प्रतिकारशक्ती आणखी वाढवू शकतो. यामुळे आपण खूप काळ कोरोनापासून संरक्षित राहू. दोन डोसमधील इम्युनिटीचा काळ आणि कोरोनाच्या नवा व्हेरिएंटपासून संरक्षणासाठी बूस्टर डोस आवश्यक आहे की नाही हे स्टडी रिपोर्टमधून निश्चित करण्यात मदत होईल.

लस उत्पादन वाढवण्यास मदत

या स्टडीचा आणखी एक फायदा की, लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवल्यास लसीकरण कार्यक्रमालाही चालना मिळेल. दोन डोसमध्ये अंतर राखल्यास जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करता येईल. कंपन्यांनाही लस उत्पादन करण्यासाठी वेळ मिळेल. सध्या बऱ्याच देशांमध्ये लसीच्या दोन डोसमधील अंतर ४-१२ आठवडे आहे. भारतात कोविशील्डच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये १२ ते १६ आठवड्यांचे अंतर ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या