‘महत्त्वाच्या क्षेत्रांत सहकार्याच्या संधी’
By Admin | Updated: January 24, 2015 01:26 IST2015-01-24T01:26:34+5:302015-01-24T01:26:34+5:30
ओबामांच्या दौऱ्यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दोन्ही देशांतील सहकार्यासाठी सर्वाधिक महत्त्वाच्या क्षेत्रांत सहमती बनण्याची मोठी शक्यता असल्याचे सांगितले.
‘महत्त्वाच्या क्षेत्रांत सहकार्याच्या संधी’
दावोस : ओबामांच्या दौऱ्यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दोन्ही देशांतील सहकार्यासाठी सर्वाधिक महत्त्वाच्या क्षेत्रांत सहमती बनण्याची मोठी शक्यता असल्याचे सांगितले. कोणत्याही क्षेत्राचा उल्लेख न करता त्यांनी दोन्ही देशांत परिपक्व संबंध असून अनेक क्षेत्रांतील सहकार्याबाबत अगोदरच मतैक्य झाले आहे. अनेक क्षेत्रांत आमच्यात मतभिन्नता आहे. मात्र, आमच्यातील परिपक्वतेमुळेच द्विपक्षीय संबंध टिकून आहेत, असे ते म्हणाले. येथील जागतिक आर्थिक परिषदेच्या अनुषंगाने ते बोलत होते.
आण्विक उत्तरदायित्वासंबंधीचे मुद्दे व हवामान बदलाचा या क्षेत्रांत समावेश आहे का, असे विचारले असता जेटली यांनी आमचे हवामान बदलाबाबत स्वतंत्र मत आहे. यामुळे यावर द्विपक्षीय नेतेच मत व्यक्त करतील. भारत आपल्या परीने हवामान बदलावर काम करत आहे. अक्षय उर्जेबाबत आम्ही अन्य देशांच्या तुलनेत अधिक काम करत असल्याचेही जेटली यांनी यावेळी नमूद केले. (वृत्तसंस्था)