शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी हाफिज सईद आणि पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्यात हातमिळवणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 13:29 IST

काश्मीरमधील लोकांच्या मानवाधिकाराचा मुद्दा उचलून पाक भारतावर खोटे आरोप करत आहे.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान बिथरलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीरचा मुद्दा घेऊन गेल्यानंतरही पाकिस्तानच्या पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे सैरभैर झालेल्या पाकिस्तानकडून दहशतवादाचा वापर केला जाऊ लागला आहे. जगातील इतर देशांमध्ये चीनशिवाय कोणत्याही देशाने पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही. 

अशातच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि मुंबईमधील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफीद सईद यांचे पोस्टर्स लाहोरमध्ये लागले आहेत. त्यामुळे भारतात पुन्हा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचं षडयंत्र रचलं जात आहे का असा सवाल सर्वांच्या मनात निर्माण होईल. काश्मीरमधील लोकांच्या मानवाधिकाराचा मुद्दा उचलून पाक भारतावर खोटे आरोप करत आहे. पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनादिवशी हे पोस्टर्स संपूर्ण लाहोर शहरात आणि पाकिस्तानातील काही भागात झळकले होते. यात निळ्या अक्षरात हाफिज मोहम्मद सईद लिहिलं आहे तर पिवळ्या अक्षरात जश्न ए आजादी मुबारक असं लिहिलं आहे. 

एकीकडे भारत पाकिस्तान यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करण्याचं नाटक करायचं तर दुसरीकडे पाकिस्तानातील दहशतवाद्यांना खतपाणी घालयाचं हे उद्योग करणाऱ्या पाकचा बुरखा या पोस्टर्सच्या निमित्ताने पुन्हा एकदा फाटला आहे. लाहोर शहरात लागलेल्या या पोस्टर्सवरून हाफिज सईदसोबत पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचे किती जवळचे संबंध आहेत हे स्पष्ट होतं. पाकिस्तानी सरकारकडून त्या देशात कार्यरत असणाऱ्या दहशतवाद्यांना पाठबळ दिलं जातं. त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई केली जात आहे. मात्र हाफिज सईदला जेलमध्ये टाकल्याचं सांगत आलीशान गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आलं आहे. तसेच बाकी दहशतवाद्यांना अंडरग्राऊंड राहण्याचं फर्मान सोडले आहे. पाकिस्तान स्वत:वरील आरोप कितीही फेटाळून लावत असले तरी दरवेळी पाकिस्तानचा खरा चेहरा समोर येतोच. या पोस्टर्सवरून हाफिज सईदला हाताशी घेत भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचं षडयंत्र पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान रचत आहेत का? हा गंभीर प्रश्न निर्माण होतो. 

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले होते की, त्यांच्या देशातील आधीच्या सरकारने कधी सत्य समोर आणलं नाही की, पाकिस्तानात 40 वेगवेगळे दहशतवादी गट सक्रीय आहेत. मात्र पाकिस्तान दहशतवाद या विषयाकडे किती गांभीर्याने पाहते हे या पोस्टर्समधून समोर येत आहे.  

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीhafiz saedहाफीज सईदImran Khanइम्रान खानIndiaभारत