बीअरच्या बाटलीवरील गांधीजींच्या चित्राने वाद

By Admin | Updated: January 5, 2015 07:29 IST2015-01-05T06:49:56+5:302015-01-05T07:29:55+5:30

महात्मा गांधीजींच्या नावासह त्यांच्या चित्राचा वापर करून बीअर विकणाऱ्या अमेरिकेतील एका कंपनीविरुद्ध हैदराबादेतील

Controversy over Gandhiji's picture on a beer bottle | बीअरच्या बाटलीवरील गांधीजींच्या चित्राने वाद

बीअरच्या बाटलीवरील गांधीजींच्या चित्राने वाद

वॉशिंग्टन/हैदराबाद : महात्मा गांधीजींच्या नावासह त्यांच्या चित्राचा वापर करून बीअर विकणाऱ्या अमेरिकेतील एका कंपनीविरुद्ध हैदराबादेतील कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर कनेक्टिकट येथील न्यू इंग्लड ब्रुइंग कंपनीने माफी मागून वाद संपविण्याचा प्रयत्न केला. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होईल.
अ‍ॅड. सुंकारी जनार्धन गौड यांनी ११व्या महानगर दंडाधिकारी (सायबराबाद) यांच्या कोर्टात या कंपनीविरुद्ध याचिका दाखल केली आहे. बीअरची बाटली आणि डब्यावर गांधीजींच्या नावासोबत त्यांच्या चित्राचा वापर करणे अत्यंत निषेधार्ह असून, हा प्रकार भारतीय कायद्याअंतर्गत दंडनीय आहे. प्रिव्हेन्टेशन आॅफ इन्सल्ट्स टू नॅशनल आॅनर अ‍ॅक्ट १९७१ आणि भादंवि कलम १२४-ए तहत ही याचिका दाखल केली आहे. या कंपनीची उत्पादने आंतरराष्ट्रीय स्तरावर विकली जात नाहीत. (वृत्तसंस्था)

Web Title: Controversy over Gandhiji's picture on a beer bottle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.