पारंपरिक औषधी क्षेत्रासाठी करार
By Admin | Updated: September 11, 2014 02:23 IST2014-09-11T02:23:31+5:302014-09-11T02:23:31+5:30
आयुर्वेद आणि युनानी यासारख्या पारंपरिक औषधांच्या क्षेत्रात बांगलादेश आणि भारताने सहमती करारावर येथे मंगळवारी स्वाक्षरी केली

पारंपरिक औषधी क्षेत्रासाठी करार
ढाका : आयुर्वेद आणि युनानी यासारख्या पारंपरिक औषधांच्या क्षेत्रात बांगलादेश आणि भारताने सहमती करारावर येथे मंगळवारी स्वाक्षरी केली. जागतिक आरोग्य संघटनेने (हू) दक्षिण-पूर्व आशियात आरोग्य या पारंपरिक औषधांच्या वापरावर अधिक भर दिल्याची पार्श्वभूमी या कराराला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या येथे झालेल्या दक्षिण-पूर्व आशिया विभागीय परिषदेनिमित्त हा करार झाला. (वृत्तसंस्था)