काँग्रेस पक्षाला दिलासा
By Admin | Updated: December 21, 2014 02:14 IST2014-12-21T02:14:29+5:302014-12-21T02:14:29+5:30
येथील एका संघराज्य न्यायालयाने काँग्रेस पक्षाविरोधातली १९८४ च्या शीख मानवाधिकार उल्लंघनासंदर्भातील एक याचिका फेटाळून लावली आहे.

काँग्रेस पक्षाला दिलासा
न्यूयॉर्क : येथील एका संघराज्य न्यायालयाने काँग्रेस पक्षाविरोधातली १९८४ च्या शीख मानवाधिकार उल्लंघनासंदर्भातील एक याचिका फेटाळून लावली आहे.
मानवाधिकार उल्लंघनाचे प्रकरण हे अमेरिकेशी संबंधित नसल्याचेही न्यायालयाने एका मानवाधिकार संघटनेने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीत स्पष्ट केले.
अमेरिकेच्या सेकंड सर्किट कोर्ट आॅफ अपीलच्या तीन न्यायाधीशांच्या पीठाने यावरील सुनावणी केली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेली दंगल व हत्याकांडासाठी काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याचा दावा करणारी ‘शीख फॉर जस्टिस’ची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
पीठाने स्पष्ट केले की, दंगलीस काँग्रेसचे नेते जबाबदार असल्याचा याचिकाकर्त्यांच्या आरोपात तथ्य आहे असे म्हणावयाचे झाल्यास, हे असे कृत्य आहे की, जे भारतीय नागरिकांविरोधात अन्य भारतीय लोकांनी केले आहे. या तर्कानुसार, अशा प्रकारच्या दाव्यांवर विचार करणे हे आमच्या अधिकारात येत नाही.
(वृत्तसंस्था)
दरम्यान, संघटना यासंदर्भात पुन्हा खटला दाखल करणार असल्याचे शीख आॅफ जस्टिसचे कायदेविषयक सल्लागार गुरपतवंत सिंग पन्नून यांनी सांगितले.
न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत काँग्रेस पक्षाचे वकील रवी बत्रा यांनी सांगितले की, खटला चुकीचा असल्याचे संघटनेने मान्य करायला हवे आणि आता येथेच या प्रकरणाला पूर्णविराम द्यावा.